आपला जिल्हा

सावकाराने अल्पशा कर्जात हडप केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे विक्रीपत्र रद्द करा.

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

सावकारी अधिनियम 2014 चे उल्लंघन केल्याने मनसेची जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदन.

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यामधील वरोरा-भद्रावती तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सिद्धार्थ ढोके, चिरकुटा ढे’गळे व इतर सावकारांनी अल्पसे कर्जात

विक्री करून हडप केल्याने त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे विक्रिपत्र रद्द करावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी चंद्रपूर प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी मनसे जनहित कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश कालबान्धे, पीयूष धूपे व पिडीत शेतकरी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेजमिनीची सावकारांनी अल्पसे कर्जात जबरन व बनावट विक्री करून स्वतःच्या नावे त्या शेतजमिनी फेरफार केल्या व त्या शेतजमिनी परस्पर दुसऱ्यांना विकून शेतकऱ्यांना भूमिहीन केले आहे. वरोरा, भद्रावती तालुक्यात सावकारी कर्जाच्या मोबदल्यात शेतजमिनीची विक्री दाखवून शेतजमीन हडप करणारी टोळी सिद्धार्थ महादेव ढोके राहणार कर्मवीर वार्ड वरोरा यांच्या पुढाकाराने मागील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. या टोळीत चिरकुटा उर्फ अविनाश गोपाळा ढे’गळे राह. चिनोरा ता. वरोरा यांसह जवळपास 20 ते 25 सावकारांच्या टोळी सक्रिय असून अल्पसे कर्ज शेतकऱ्यांना द्यायचे व त्या मोबदल्यात जमीन गहाण ठेवण्याच्या सबबीखाली त्या जमिनीची ठराविक साक्षदार यांच्या माध्यमातून विक्री करायची शिवाय त्या शेतजमिनीचा फेरफार घेऊन स्वतःच्या नावे ती शेतजमीन केल्यानंतर ती दुसऱ्यांना परस्पर विक्री केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. या संदर्भात आपल्या कार्यालयात अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट सुद्धा आहे. दरम्यान महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 1014 व सावकारी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत निबंधकांना न्यायाधीशांचे अधिकार मिळाले असताना व राज्यात सावकारांकडून होणारी कर्जदारांची पिळवणूक रोखण्याची जबाबदारी आपली असताना आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची विक्री केली त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे विक्रीपत्र रद्द करणे गरजेचे आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सावकारांनी अल्पशा कर्जात हडपल्या त्यात सिद्धार्थ ढोके. चिरकुटा उर्फ अविनाश ढे’गळे रा. चिनोरा याशिवाय अनिल नारायण वरखडे, जगदीश कामडी, दादा करडक, रवींद्र डोंगरे जयदेव बोढाले, किरण दत्तात्रय तुरानकर रा. शिवाजी वार्ड वरोरा, प्रेमिला डुमदेव पारखी, अशोक नानाजी पारखी राह. राजेंद्र प्रसाद वार्ड, रवींद्र वाल्मिकीराव डोंगरे, बालाजी नारायण कोल्हेकर, विनोद केशव हरनारे. प्रफुल्ल नागोराव रामटेके रा. गांधी वार्ड गडचिरोली. आशा अरविंद चौधरी राह. मोहबाळा ता वरोरा. गोविंद मनोहरदास तेला राह. सहकार नगर चंद्रपूर. विजय डोमाजी भोले, विनोद कवडू चांभारे राह. हनुमान वार्ड वरोरा, कल्पना नंदकिशोर निब्रड, सुधीर नामदेव तोडेकर, रुपेश अशोकराव ढोके, गजानन अजाबराव कहुरके, सुरेश जोगेन्द्र कांबळे, सुभाष बिजाराम वाटकर, विनोद मधुकर वाटकर इत्यादीचा समावेश आहे. त्यांच्या या टोळीत काही साक्षीदार हे नेहमीच तेच ते आहेत जे कमिशन खाण्यासाठी यांच्यासोबत असतात हे सर्व रजिस्ट्री वरून दिसून येतं आहे.

दरम्यान त्यांच्या या टोळीमुळे सौ सुनीता गोविंदा आंबाडे, रामा बाळकृष्ण डुकसे रा. लोणार, धनराज मारोती आंबाडे चिनोरा. पंढरी महादेव गौरकार राह. गिरोला, प्रभाकर नामदेव कळसकर रा. जामगांव, बळीराम विश्वनाथ महाकुळकर रा. दहेगाव, दुधिराम धोंडू भागडे रा. शेगांव खुर्द, बाबुराव नारायण ठावरी राह, पानवडाळा तालुका भद्रावती. नारायण नत्थु ठमके राह. दहेगाव ता. वरोरा, गौरव नानाजी लुच्चे राह. शेगाव (बु ) ईश्वर नामदेव टापरे राह पोहा ता वरोरा. नानाजी खजांजी टो’गे रा. चिकनी, सुमन संभाजी जेयुरकर रा. जामनी, नरेंद्र लटारी थेरे डोंगरगाव ता भद्रावती, उत्तम मारोती चिंचोलकर राह. बांद्रा ता वरोरा, मिलिंद बोरकर रा. आष्टी, दिलीप बापूराव मोहारे रा. साखरा, वसंता झित्रुजी बोढे रा. मोखाळा, गजानन आनंदराव दातारकर रा. शेगांव (दादापुर) इत्यादी शेतकरी लोकांची संबंधीत सावकारांनी फसवणूक केली व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था भद्रावती यांच्यामार्फत दिनांक 31/5/2018 ला दिलेल्या तक्रारी वरून सिद्धार्थ ढोके व इतरांवर कलम 384, 385, 420, 467,468, 469, 471 व सावकारी प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. पण सावकारी कायद्याला फाटा देत छल कपट व बळजबरी करून शेतकऱ्यांच्या जमिनी विक्री करण्यात आल्या त्या विक्रीपत्राला आपल्या विभागाने रद्द करण्याची कार्यवाही करायला हवी होती ती केली नाही पर्यायाने शेतकऱ्यांना न्यायालयात धाव द्यावी लागली तर काहींनी तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करून न्याय मागितला पण दरम्यानच्या काळात शेतजमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना संबंधीत सावकारांनी त्याच शेतजमिनीची दुय्यम निबंधकाच्या संगनमताने विक्री केली आहे. त्यामुळे पिडीत शेतकरी हे न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहे.

सावकारांनी हडप केलेल्या पिडीत शेतकऱ्यांच्या शेत्या परस्पर वरोरा भद्रावती या तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत सदर जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना विक्री करण्यात आल्या आहे त्यामुळे सरकारी यंत्रणा यासाठी जबाबदार असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्यांच्या जमिनीच्या रजिस्ट्री रद्द कराव्या व त्या जमिनीचा फेरफार रद्द करून मूळ शेतकऱ्यांना त्या शेतजमिनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 नुसार परत कराव्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. या निवेदनाच्या प्रती सुधीर मुनगंटीवार साहेब पालकमंत्री चंद्रपूर, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहकार आयुक्त नागपूर विभाग नागपूर.जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी साहेब वरोरा यांना देण्यात आल्या आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker