13 – चंद्रपूर लोकसभा मतदारक्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणे करिता जिल्हा प्रशासनाने केली तयारी.
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी जाहीर केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे वेळापत्रकानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघांकरीता दिनांक 20 मार्च, 2024 ते 27 मार्च,2024 या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून एकूण 48 नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यांत आलीत.
सदर नामनिर्देशनपत्रांची दिनांक 28 मार्च, 2024 रोजी छानणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर छानणीअंती एकूण 33 नामनिर्देशनपत्र अपात्र करण्यांत येवून 15 नामनिर्देशनपत्र पात्र करण्यांत आले.
सदरहु पात्र उमेदवारांना दिनांक 30 मार्च, 2024 रोजी दुपारी 03.00 वाजे पावेतो त्यांची उमेदवारी मागे घेणे करीता वेळ देण्यांत आली होती. तत्पश्चात 13-चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्राकरीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अतीम स्थिती खालीलप्रमाणे आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त रूपये 95,00,000/- (पंच्यान्नव लक्ष) खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे.
उमेदवारास निवडणूक कालावधीत दैनंदीन झालेल्या खर्चाचा हिशेब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांचे आंत संपुर्ण खर्चाचा हिशेब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.