आपला जिल्हा

राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप कोंतमवार

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

  चंद्रपूर : राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी संदीप कोेंतमवार यांची नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा वरोरा नाका येथील चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत विदर्भ विभागाचे अध्यक्ष हर्षल हिवरखेडकर यांनी ही घोषणा के ली.

यावेळी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याती शेकडोंवर कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीत प्रवेश केला. दिवंगत रामविलास पासवान संस्थापक अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीने विदर्भात एन्ट्री केली असून, आगामी सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लणार असल्याची माहिती हिवरखेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकारणासोबतच समाजकारण हा पक्षाचा अजेंडा राहणार असून, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, पेट्रोलपंपावरील कर्मचारी तसेच विविध उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देणे, वेतनवाढीसाठी लढा देणे यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे हिवरखेडकर यांनी सांगितले.

                बेरोजगारांना उद्योजक म्हणून पुढे आणण्यासाठी पुढील काळात नियोजन केले जाणार आहे. अन्नप्रकिया उद्योग उभारणीसाठी लागणारे मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला औद्योगिक सेलचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम, प्रेमदास रामटेके, रोशन अन्सारी, किशोर बट्टीवार, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष हरीश गेडाम उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker