चंद्रपुर शहर महानगरपालिका

आजाद बगीच्या पुर्नविकास सौंदर्यीकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय तृतीय पक्ष चौकशी करण्यात यावी

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांची मागणी

Adobe Scan Jul 16, 2022

 

जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर
चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात मुलभुत सुविधांच्या विकास अंतर्गत मौलाना अबुल कलाम आजाद बगीचाच्या पुर्नविकास सौंदर्यीकरण कामाकरीता 6 कोटी 53 लाख 64 हजार 670 रुपये खर्च करण्यात आले. इतका मोठा जनतेचा कोट्यावधीचा पैसा खर्च करुनही काही काळातच रस्ता,सौंदर्यीकरण कामांना भेगा पडल्या तर व्यायामाचे साहित्य तुटले, ग्रेनाईट तुटले, पेवर ब्लाक देखील फुटले असल्याचे दिसून येत असल्याने या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सदर कामात ठेकेदाराने भ्रस्टाचार केल्याचे निदर्शनास येत असल्याने ठेकेदाराची उच्चस्तरीय तृतीय पक्ष चौकशी करण्यात यावी व ठेकेदाराला काळ्या यादित टाकून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी तक्रारीतून केली आहे.
चंद्रपूर शहरातील हदय स्थळ म्हणून ओळखला जाणारा मौलाना अबुल कलाम आजाद गार्डन शहरातील नागरिक, बच्चे कंपनी,जेष्ठ नागरिक, महिलांना विरंगुळा,करमणूकीचे एकमेव ठिकाण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गार्डनला अवकळा आली होती. यामुळे गार्डनची दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची मागणी जनतेकडून अनेक वर्षापासून होत होती. अनेक वर्षांच्या मागणी नंतर अखेर महानगरपालिका मुलभुत सुविधाच्या विकास अंतर्गत 6,53,64,670 रुपये निधी मंजूर करुन बगीचाचे पुर्न विकास सौंदर्यीकरणाचे काम सुरु करण्यात आले. सदर काम मे. विजय आर. घटे इंजिनिअरींग, चंद्रपूरला देण्यात आले.24 महिन्याच्या कालावधीत सदर काम पूर्ण करण्याचा करार ठेकेदारासोबत झाला असताना या कालावधीत काम पूर्ण करण्यात आले नाही. संथगतीने काम करण्यात आले. संपूर्ण कांक्रीट रस्ता बांधकामात रेती, गिट्टी, सिमेंट व चुरी हि सामुग्री योग्य प्रमाणात वापरण्यात न आल्याने रस्ता उखडला आहे. जागोजागी रस्त्याला भेगा पडल्या आहे. संपूर्ण कांक्रीट रस्त्याचे आरसीसी, बीसीसी करते वेळी चुरी धुऊन वापरण्याचा नियम असताना त्याचे पालन केले नाही.बगीच्यात लावलेले ग्रेनाईट निकृष्ट दर्जाचे असल्याने मोठ्या प्रमाणात जागोजागी क्रक व तुटलेले आढळून येते.बसण्याची खुर्चीचे पाय अनेक ठिकाणी क्रॅक गेल्याने निकृष्ट दर्जाचे निदर्शनास येत आहे.गेट जवळील मौलाना अबुल कलाम आजाद बगीचाचे नाव व त्याचे फाउंडेशन,ग्रेनाईट तुटून पडले आहे. वाकींग ट्रकमध्ये लावलेले पेवर ब्लाक जागोजागी तुटून असल्याचे दिसत आहे.गवती ग्रेनाईट खुर्ची निकृष्ट दर्जाची दिसून येत आहे.एम. एस. लोखंडी खुली व्यायाम सामुग्री सडत असल्यामुळे जागोजागी तुटून पडली आहे. संपूर्ण बागेत लावलेले गवत काही जागेवर दिसत नाही. अशा प्रकारे एकूनच बगीचाच्या पुर्न विकास सौंदर्यीकरण कामात मोठ्या प्रमाणात भ्रस्टाचार करण्यात आला आहे. यामुळे ठेकेदाराची उच्चस्तरीय तृतीय पक्ष चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, संपूर्ण नुकसान भरपाई वसुल करण्यात यावे अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी जिलाधिकारींच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,माजी मंत्री मुनगंटीवार, माजी मंत्री वडेट्टीवार,आमदार जोरगेवार, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी,मनपा आयुक्तांना केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker