आपला जिल्हा

लाठी खावू गोळी खावू, विदर्भ राज्य मिळवून घेवू अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १९ डिसेंबरला विधन मंडळावर हल्लाबोल आंदोलन – विराआंस

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्यालयी दि. २३/११/२०२२ रोजी पार पाडलेल्या बैठकीच्या निर्णयानुसार २०२३ संपेपर्यंत विदर्भाची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टिने विदर्भ मिळवू औदां या मागणीची पुर्तता करण्याकरीता लाठी खाऊ गोळी खाऊ, विदर्भ राज्य मिळवून घेवू असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आता आरपारच्या लढाईची सुरुवात १९ डिसेंबर रोजी होणार असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळावर “हल्लाबोल आंदोलन” केले जाणार आहे. “शुरु हुई है जंग हमारी, लढगे जितेगे” या ईर्षने आंदोलन तीव्र केले जाणार आहे. विदर्भातील खासदारांचे (सत्ताधारी व विरोधी) राजीनामे मागण्याच्या १० ही खासदारांकडे केलेला प्रयोग विदर्भातील जनतेमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरला असून ही चांगली आशेचे किरण देणारी घटना आहे. हल्लाबोल आंदोलनात ११ ही जिल्ह्यातील १२० ही तालुक्यातून १० हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत व महाराष्ट्रवादी चले जावो अशी घोषना विधान मंडळावरील आंदोलनात करणार आहे. यापुढिल विधानसभा हो विदर्भचीच होईल व महाराष्ट्राची असणार नाही व महाराष्ट्रवादी विदर्भतून हद्दपार होतील.

महाराष्ट्र राज्य विदाळखारीच्या उंबराट्यावर उभे असून शेतकऱ्यांच्या भुअर्जन केलेल्या जनिनीचा मोबदला देण्याकरीता ६५ हजार कोटीचे कर्ज एम.एस.आर.डी.सी. (MSRDC) ला उभे करव लागत आहे व त्याला थकहमी ही सरकारची आहे. आधिच ६ लाख ६० हजार कोटींचे कर्ज थकहमी व लायबिलीटीच्या डोंगराच्या बोझ खाली असलेले महाराष्ट्र राज्य कदापीही सक्षम होऊ शकत नाही म्हणून विदर्भातील जनता महाराष्ट्रात १०० वर्षे राहली तरी त्यांच्या अनुशेष भरुन निघु शकत नाही या सर्व प्रश्नाचे एकच उत्तर ते म्हणजे विदर्भ स्वतंत्र राज्य

या हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात १९ डिसेंबर ला दुपारी १ वाजता नागपूरातील यशवंत स्टेडीयम वरुन होणार असून पंचशील चौक – झाशी राणी चौक – व्हेरायटी चौक – विधान भवन या मार्गाने आगेकुच करणार आहे.

या आंदोलनाला विदर्भ माझा, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, राष्ट्रीय जनता दल,राष्ट्रीय जनसुराज्य पाटी. कुणबी बहुजन स्वराज्य पार्टी, भिम आर्मी संरक्षक दल इत्यादी पक्ष व संघटनांनी जाहीर पाटीबा दिलेला असून विदर्भातील ११ ही जिल्ह्यात या आंदोलनाला विविध पक्ष व संघटनाद्वार माठ्या प्रमाणात पाटिबां मिळत आहे.

हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मीती तात्काळ व्हावी, विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी व शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करुन शेतकऱ्यांना २४ तास विज देण्यात यावी. वैधानिक विकास मंडळ नको – विदर्भ राज्यच हवे. विदर्भातील ११ ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावे.अन्नधान्यवरील G.S.T. तात्काळ रद्द करावा, बल्लारपूर – सुरजागड रेल्वेमागाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधि उपलब्ध करुन द्यावा. विदर्भातील गायरान जमिनीवरील शेतकऱ्यांचे व रहिवास्यांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना कायमस्वरुपी पट्टे देण्यात यावे या मागण्या करप्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker