आपला जिल्हा

 *महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपाचा मंत्री चंद्रकांत पाटील याच्यावर गुन्हा दाखल करा*

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

*उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी*

 

बल्लारपूर:- उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील सभेत महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा अपमान केला. “महात्मा ज्योतीराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भिक मागून शाळा सुरू केल्या” असे निर्लज्ज विधान त्यांनी करून त्यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला त्या विधानाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी व त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली.

      ज्या वर्णव्यवस्थेनी हजारो वर्षापासून अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटलांनी व बाबासाहेबांनी जीवाचे रान करून बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला.त्यांच्या या कार्यामुळेच आज घडीला महिला उत्तुंग भरारी मारत आहेत. आजही मनुवादी लोकांना ही गोष्ट खटकते व त्यांना अजूनही बहुजन समाज गुलामच राहिला पाहिजे असे वाटते. भाजपांच्या नेत्यांनी हेतू परस्पर महापुरुषांचा अपमान करायचा व भावना दुखवायच्या हे भाजपाचे मोठे षडयंत्र असून यामुळे महाराष्ट्राचे राजकीय व सांस्कृतिक वातावरण बिघडले आहे. चंद्रकांत दादा पाटील यांनी असे बेभान वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावलेल्या असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या मागणी करीता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी प्रशासनाला निवेदन दिले. महापुरुषांच्या अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटीलवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे संपत कोरडे,जयदास भगत यांनी प्रशासनाला दिला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker