आपला जिल्हा

24 फेब्रुवारी 2023 रोजी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनतर्फे चंद्रपूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजतापासून नागपूर रोड चंद्रपूर येथे शकुंतला लॉनच्या हॉलमध्ये गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे युवा आमदार अॅड.  अभिजित मेळाव्याचे आयोजन केले आहे.

वंजारी यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिकलेल्या युवक-युवतींसाठी भव्य अशा रोजगारया रोजगार मेळाव्यामध्ये Oppo, DTDC, Baidyanath, Just dial, BAJAJ Finserv, Endurance, Radiant Guard, Light house, GIF technologies, True forms, Diffusion, Racerking, Axis bank, HDFC Bank, Bajaj Steel,Sahayog Bank, Plasto, Plasto, UCN, Sumax Engineering, BVG, ZF steering, Leadec India, Sahayog Group,Aurangabad Auto Ancillary, ABCO Computer, Goyam Auto, Aditya Birla Life Insurance, Sashi Menan & Associates या सर्व कंपन्याचे एच.आर., व्यवस्थापक, अधिकारी प्रत्यक्षात गुलाखती घेऊन त्यांना जॉब प्लेसमेंट देण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्याकरिता यामध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे (Electronics Engineering, Mechnical Engineering & Civil Enginerring) च्या विद्यार्थ्यांकरिता 300 ते 400 जागा उपलब्ध राहणार आहे.

तसेच Engineering Diploma करिता 350-450 जागा, BBA, BCA पास झालेल्या विद्यार्थ्याकरिता 600 जागा, B.Sc. M.Sc. IT, B.Sc. Computer Science, M.Sc. IT, M.Sc. Computer Science, B.E. Computer Science या शैक्षणिक पात्रतेच्या विद्यार्थ्याकरिता 150 जागा, B.Sc., M.Sc. Chemistry, Biology या विषयाकरिता 100 जागा, B.A., B.Com, M.Com. करिता 200-250 जागा,ITI पास केलेल्या विद्यार्थ्यांकरिता 400-500 जागा आणि दहावी व बारावीच्या विद्यार्थ्याकरिता 300 जागा वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध असून त्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

या कंपन्याच्या माध्यमातून वर उल्लेखलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्याथ्र्यांकरिता Human Resource IT Developers, Software Development, Production Engineeer, Maintenance Engineer, Manaagement & Administration, Management Training, Welder, Fitter, Marketing Executive Banking Sales & Operations इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या जागेवर या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या होणार आहे.गोविंदराव बंजारी फाऊंडेशनच्या वतीने व आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने दरवर्षी नागपूर विभागातील सहाही जिल्हयामध्ये अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन केल्या जाते. नुकतेच नागपूर येथे जगनाडे चौक नंदनवन, नागपूर येथे 7 सप्टेंबर 2022 ला नागपुरकरांकरिता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

त्यामध्ये 1200 पेक्षा अधिक युवकांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब देण्यात आले. चंद्रपुरच्या या आयोजनानंतर अशाच धर्तीवरचा कार्यक्रम व रोजगार मेळाव्याचे गडचिरोली, गोंदिया, भंडारा व वर्धा या ठिकाणी सुध्दा आयोजन करण्यात येणार आहे.अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विदर्भातील युवकांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याकरिता आणि त्यांच्यामध्ये कार्पोरेट कल्चर तयार करण्याकरिता अशा पध्दतीचे कार्यक्रम करण्याचा मानस युवा आमदारअॅड. अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker