क्राईम

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 परंतु चंद्रपुर चे अनेक

बुकीवर कार्यवाही कधी?

सद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठया प्रमाणात सटटा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करन्याचे मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर यांनी निर्देश दील्याने विशेष मोहीम राबवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत.

पो.स्टे पडोली हद्दीतील यशवंतनगर येथे MH-34 पानठेला येथे येथे जुगल हिरालाल लोया हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरूध्द लखनौ सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण १२,०१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सटटेबाज नामे १) जुगल हिरालाल लोया वय ४८ वर्ष रा यशवंत नगर हनुमान मंदिरजवळ पडोली जि चंद्रपुर २) पाहिजे आरोपी नामे पारस उडाक रा.. चंद्रपुर यांचे विरूदध पो.स्टे पडोली येथे अप.क्र. ७०/२०२३ कलम १२ (अ) म.जु.का, सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे पडोली करित आहे.

 

तसेच पो.स्टे रामनगर हद्दीतील रयतवारी कॉलरी चंद्रपुर येथील सि.आर.सि ग्राउन्डचे गेटसमोरयेथे सिध्दार्थ राजकुमार कुरमी हा इंडियन प्रिमीयर लीग ( IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरूध्द लखनौ सुपर जायटंस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण १७,८१० /- रू. चा माल जप्त करण्यात आला असुन सटटेबाज नामे सिध्दार्थ राजकुमार कुरमी वय २५ वर्ष रा. रयतवारी कॉलरी बि.एम. टि. चौक चंद्रपुर यांचे विरूदध पो स्टे रामनगर येथे अप. क्र. ३४९/२०२३ कलम १२ (अ) म. जु. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे रामनगर करित आहे.

 

तसेच पो.स्टे भद्रावती हद्दीतील एकता नगर चारगाव येथील मंगेश दुरुडकर हा इंडियन प्रिमीयर लीग ( IPL-2023) सनराईज हैद्राबाद विरूध्द लखनौ सुपर जायटस क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशी खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाल्यावरून वरीष्ठांचे आदेशान्वये छापा टाकला असता सदर ठिकाणी सदर इसम मोबाईलवर संभाषण व मेसेज करून, लॅपटॉप व नोंदवही वर आकडे लिहुन IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडुन ४ मोबाईल, लॅपटॉप नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण ६३,५५०/- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सटटेबाज नामे मंगेश अरुन दुरुडकर, वय ३२ वर्ष रा. एकता नगर वेकोली वसाहत भद्रावती जि. चंद्रपुर यांचे विरूदध पो स्टे भद्रावती येथे अप. क. १५८ / २०२३ कलम ४,५ म जु. का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे भद्रावती करित आहे.

 

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर सपोनी मंगेश भोयर, पो.उप.नि. अतुल कावळे, पो.हवा. संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नापोकॉ संतोष येलपुलवार, गजानन नागरे, पोकॉ नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले, कुंदन बावरी, रविंद्र पंधरे, अजय बागेसर, संदीप मुळे, प्रशांत नागोसे, चालक नापोशी चंद्रशेखर आसुटकर यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker