भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरातर्फे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
चंद्रपूर: भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तसेच महाराष्ट्रात भाजप पक्षाला प्रबळ करणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांची आज 3 जून रोजी ९ व्या पुण्यतिथी निमित्ताने भाजप चंद्रपूर महानगरातील जिल्हाध्यक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाला मजबुतीकरण करण्याचे महान कार्य केले त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्यांचेकडून प्रेरणा घेऊन पक्ष वाढीसाठी उत्कृष्ट कामे करायची त्याचेच फलित आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळाले. लोकनेते मुंडे साहेबांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे विरोधी पक्षातील नेते त्यांचा आदर करत होते अश्या त्यांच्या वागण्यामुळे साहेबांच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात आदरांजली वाहिली जात आहे. त्यामुळे आज आपल्याला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर महानगरात एकनिष्ठतेने काम केले पाहिजे असे आज या आदरांजली कार्यक्रमात महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्हा महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगराचे महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, रवी गुरनुले, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, चंद्रपूर जिल्हा महानगरातील मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर तसेच नसरीन शेख, स्मिता रेभनकर, वंदना संतोषवार, सौ, अपर्णा प्रवीण चिडे, शशिकांत म्हस्के, संजय श्रा, गरमडे, कुंदन खोब्रागडे, गणेश गजानन झाडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती