आपला जिल्हा

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे सदस्यांसाठी आरोग्य शिबिर

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर : विमलादेवी आयुर्वेदिक महाविद्याल वांढरी, महानगरपालिका चंद्रपूर आणि चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवार ८ एप्रिल रोजी श्रमिक पत्रकार संघाच्या वरोरा येथील भवनात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांचे आरोग्य उत्तम राहावे या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ईसीजी, रक्ततपासणी, बीपी, शूगर आदीचे निदान करण्यात आले. या शिबिराला पत्रकार संघाच्या सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. विमलादेवी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष इंद्रसेन सिंग, राहुल सिंग, अंकिता सिंग यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी डॉ. जोग, डॉ. गणुरे, डॉ. मंगेश निकम, डॉ. सोनल आत्राम, डॉ. गार्गी वैरागडे, डॉ. अनुष्का बिंडालकर, यांच्यासह नीलेश तोगट्टीवार, सुनील हुकरे, लॅब टेक्निशियन पौर्णिमा चेडे, प्रियंका श्रीवास, परिचारिका तारलिका शेडमाके, मंगला गायकवाड यांच्या चमूने तपासणी केली. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय तसेच शहरातील अन्य पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker