स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची IPL क्रिकेट सट्टेबाजांवर धडक कार्यवाही
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

सद्या सुरू असलेल्या IPL क्रिकेट वर मोठया प्रमाणात सटटा लावण्यात येत असल्याने त्यावर कारवाही करन्याचे पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी निर्देश दील्याने विशेष मोहीम राबवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत..
दि. 08/04/2023 रोजी मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन पो स्टे गोंडपीपरी हद्दीतील भंगाराम तळोधी येथे चौकातील मारगोनवार यांचे आटा चक्की समोर अभिलाश शरद मारगोनवार, वय 27 वर्ष रा भंगाराम तळोधी ता. गोंडपीपरी जि चंद्रपुर हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) राजस्तान रॉयल्स विरूध्द दिल्ली कॅपीटलया IPL क्रिकेटच्या मॅचवर मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहुन IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आल्याने त्याकडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण 21,705 /- रू. चा माल जप्त करण्यात आला सटटेबाज अभिलाश शरद मारगोनवार, वय 27 वर्ष रा भंगाराम तळोधी ता. गोंडपीपरी जि चंद्रपुर यांचे विरूदध पो. स्टे गोंडपीपरी येथे अप.क्र. १०२/२०२३ कलम १२ (अ) म.जु.का, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो.स्टे गोंडपीपरी करित आहे.
तसेच दि. 09/04/2023 रोजी मिळालेल्या खबरेवरुन पो स्टे रामनगर हद्दीतील इंदीरा नगर चंद्रपुर येथे चौकातील सिद्धु पान सेंटर ऐथे सिध्दांत माधव गोंडाने, वय 30 वर्ष रा राजीव गांधी नगर, चंद्रपुर जि चंद्रपुर हा इंडियन प्रिमीयर लीग (IPL-2023) कोलकत्ता नाईट रायडर विरूध्द गुजरात टायटन क्रिकेट या IPL क्रिकेटच्या मॅचवर मोबाईलवर संभाषण व मेसेज करून व कागदावर आकडे लिहून IPL क्रिकेट सटटा चालवीतांना मिळुन आल्यांने त्याकडुन मोबाईल, नगदी रक्कम, जुगाराचे ईतर साहीत्य असा एकुण 17,105 /- रू. चा माल जप्त करण्यात आला सटटेबाज सिध्दांत माधव गोंडाने, वय 30 वर्ष,रा राजीव गांधी नगर, चंद्रपुर जि चंद्रपुर यांचे विरूदध पो.स्टे रामनगर येथे अप.क्र. ३५७ / २०२३ कलम १२ (अ) म.जु.का, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो स्टे रामनगर करित आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावळे, पोहवा नितीन साळवे नापोशी सुभाष, अनुप, मिलींद, नितेश, पोशी सतीश,मयुर, मिलींद यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.