आपला जिल्हा

साडेसात कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणात संशयित मोकाटच

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

पाच महिन्यांपूर्वीच दाखल : चार हजारांवर गुंतवणूकदारांचे पैसे अडकले

चंद्रपूर : चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल सात कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची बाब लेखा परिक्षकाच्या अहवालात पुढे आल्यानंतर लेखा परीक्षकाने चिमूर पोलीस ठाण्यात गैरव्यवहाराची तक्रार नोंदविली. यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये पाच महिन्यांपूर्वीच गुन्हे दाखल केले आहे. मात्र, पाच महिल्यात संशयितांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आक्रमक झाले असून, आठ दिवसात संशयितांना अटक न झाल्यास चिमुरात बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी चंद्रपुरात श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अरुण संभाजी मेहरकुरे, अमोल अरुण मेहरकुरे, अतुल अरुण मेहरकुरे, मारोती वाल्मिक पेंदोर, अनिल भाऊराव नन्नावरे आणि सारंग नामक व्यक्तीने मोठ्या प्रमाणात संगनमत करून गुंतवणूकदारांच्या रकमेवर डल्ला मारला आहे. यातील अरुण मेहरकुरे, अमोल मेहरकुरे अतुल मेहरकुरे हे एकाच कुटुंबातील असून, अरुण मेहरकुरे हा माजी मानद सचिव असून, अमोल पेंदोर हा लिपिक तर अतुल पेंदोर हा दैनिक अभिकर्ता म्हणून कार्यरत होता. तर पेंदोर हा माजी व्यवस्थापक आहे. या संशयितांनी नियमबाह्यपणे कर्जाची उचल केली आहे. तसेच कागदोपत्री अफरातफर करून ७ कोटी ६६ लाख ९० हजार ५१० रुपयांचा अपहार केली. उपलेखा परीक्षक रा. सु. लांडगे यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर चिमूर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबररोजी तक्रार दाखल करण्यात आली. चिमूर पोलिसांनी हे आर्थिक गुन्हेशाखेकडे न पाठविता दोन महिने स्वत:कडेच ठेवले. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण सोपविण्यात आले. याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने संशयितांविरुद्ध ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६८, ४७१, ४७७ (अ) ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.

आता पाच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, अद्याप संशयितांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार की नाही अशी भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी या पतसंस्थेत मोठ्या रकमा गुंतविल्या आहेत. गरीब, शेतमजूर, छोटेमोठे व्यावसायिकांनी दैनिक ठेव तसेच मुदती ठेवअंतर्गत रकमा जमा केल्या आहेत. पंरतु, गैरव्यवहारामुळे रकमा अडकल्याने अनेकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आक्रमक झाले झाले आठ दिवसात रकम न मिळाल्यास बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा गुंतवणूकदारांनी चंद्रपुरात पत्रकार परिषदेत दिला आहे. पत्रकार परिषदेला अजय चौधरी, मनीष पटेल, किशोर अंबादे, अविनाश रासेकर, मोरेश्वर बावरे, भारती दडमल, नसिमा शेख, सुनिता कामडी, माधव दुर्गे, प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker