आपला जिल्हा

चंद्रपूर नागरी मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेत ४९ लाखांचा अपहार

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह ११ जणांवर गुन्हे दाखल

चंद्रपूर : चंद्रपूर नागरी मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेच्या लेखा परीक्षण अहवालात तब्बल ४९ लाखांचा अपहार झाल्याची बाब पुढे आली असून, लेखा परीक्षक रमणकुमार निमकर यांच्य तक्रारीवरून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकासह ११ जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात १ मार्च रोजीच गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली असून, संचालकांना अटक करण्यात यावी तसेच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार यांनी मंगळवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

या पतसंस्थेत अनेकांनी मोठ्या रकमा गुंतविल्या आहेत. मात्र, मुदतीनंतरही रकमा मिळत नसल्याने अनेकांनी तक्रारी केल्यानंतर पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यात आले. दरम्यान, १ एप्रिल २०१९ ते ३२ मार्च २०२१ या तीन वर्षाच्या काळात संस्थेत तब्बल ४९ लाख ४८ हजार १७८ रुपयांचा अपहार झाल्याची बाब उजेडात आली. दरम्यान लेखा परीक्षक निमकर यांनी १ मार्च२०२३ रेाजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अध्यक्ष गौतम जिवने, उपाध्यक्ष अजित राजाराम भडके, व्यवस्थापक राजाराम तुकाराम भडके, संचाकल विकेक आत्माराम नळे, लोकचंद रंेदुलाल लिल्हारे, देवराव राखोबा पिंपळकर, सुभद्रा अनिल निरापुरे, गीता वासुदेव दास, गीता विजय पालनवार तसेच दोन दैनिक अभिकर्त्यांवर भादंवि कलम ४०६, ४२०, ४०९, ३२आणि एमपीआयडी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, संशयितांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, त्यांचा जामीन अर्ज फे टाळण्यात आला आहे. मात्र, यानंतरही पोलिसांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली नाही त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पैसे परत मिळणार की नाही, याबाबत भीती निर्माण झाली आहे. अनेकांनी यात मोठ्या रकमा गुंतविल्या आहेत. शेतकरी, शेतमजूर, लहान व्यावसायिकांनी येथे गुंतवणूक केली आहे. त्यामुळे संशयितांना अटक करण्यात यावी, गुंतवणूकदारांना त्यांच्या पैसा परत मिळवून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर पोतनवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker