आपला जिल्हा

जय परशुरामच्या जयघोषाने दुमदुमले चंद्रपूर_बहुभाषिक ब्राह्मण सभेने काढली शोभायात्रा

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

चंद्रपूर ब्यूरो. येथील बहुभाषिक ब्राह्मण सभेतर्फे परशुरामाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर शनिवारी 22 एप्रिल रोजी भगवान परशुरामाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत भगवान परशुरामाची प्रतिकृती एका रथावर स्थापित करून ही शोभायात्रा सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य मार्गावरील श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून प्रारंभ झाली.

या शोभायात्रेत प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचे प्रमुख विनोद उपाध्याय, पुनम तिवारी, अनुपम दीक्षित, अंकित तिवारी, संकेत मिश्रा, शैलेश किरकोळ, सुनील तिवारी, अॅड. सुनील पुराणकर यांची उपस्थिती होती. सायंकाळी सहाच्या सुमारास भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पुरोहित प्रकाश वेदांत व मारोती महाराज यांनी पूजन केले. या पूजनानंतर ही शोभायात्रा जटपुरा गेट मार्गे गिरनार चौक नंतर गांधी चौक मार्गे लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचली. तब्बल दोन तास चाललेल्या या शोभायात्रेने चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

..चौकट..

विविध ब्राह्मण संघटनांचा सहभाग

भगवान परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित शोभायात्रेत महानगरातील राजस्थानी, मारवाडी, देशस्थ, मेवाडी, उत्तर भारतीय व महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा, तसेच अखिल युवा ब्राह्मण एकता मंच यांनी सहभाग घेतला. या शोभायात्रेत मातृशक्तीची उपस्थिती लक्षणीय होती. महिलांनी लाल साडी तर पुरुषांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker