आपला जिल्हा

‘हद्द 2’ एक अनहोनी घटना ची चित्रपट निर्मिती जुळवा जुळवी अंतिम टप्‍प्‍यात

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर:-  चंद्रपूरचे प्रख्‍यात युवा चित्रपट निर्माते देवा बुरडकर (९६३७९५७९८८) आणि प्रितम खोब्रागडे (९९२३१९५२१८) यांनी एस. के. प्रोडक्‍शन चे माध्‍यमातून एक सर्वांगसुंदर पर्यावरण संदेश देणारा मराठी चित्रपट हद्द एक मर्यादा ची निर्मिती केली होती ज्‍याला चंद्रपुरातील चित्रपट रसिकांनी भरभरुन सहभग व सहकार्य केले. त्‍यांच्‍या ट्रेलर प्रदर्शन कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, सांस्‍कृतिक, नाट्यवंत, वनविभाग, पोलिस विभाग समवेत सर्व क्षेत्रातील दिग्‍गजांनी आपले आशिर्वाद व शुभेच्‍छा प्रदार केल्‍या होत्‍या आणि दुस-या कलाकृतीची ही मागणी केली होती त्‍यानुसार हद्द एक अनहोनी घटना ची निर्मिती अंतिम टप्‍यावर येऊन ठेपली आहे.

‘हद्द २’ एक अनहोनी घटना हा सुध्‍दा मराठी चित्रपट आहे. याही चित्रपटात एक सामाजिक संदेश देण्‍याचा पुरेपुर प्रयत्‍न निर्माते व्‍दय देवा बुरडकर आणि प्रितम खोब्रागडे यांनी केला आहे. पुर्णपरिवार एकत्र बसुन आनंद घेईल असे कथानक आणि निर्मितीवर पुर्ण भर देण्‍याचा निर्मात्‍यांचा मानस आहे. चित्रपटात शंभर टक्‍के जनतेचा सहभाग असेल चित्रीकरण शहरातच राहील, जिल्‍ह्यातील सुप्रसिध्‍द वास्‍तुंचे चित्रीकरण होईल. स्‍थानिय कलावंताना वावं मिळेल. चंद्रपूरचा नाव लौकीक होईल या बाजू ध्‍यानात ठेऊन चित्रपट निर्मितीचे प्रारंभिक कार्य पार पडून कथानक, तांत्रीक बाब यांची जुळवणी अंतिम टप्‍यात येऊन ठेपली आहे लवकरच याची अधिकृत माहिती कळविण्‍यात येईल असे प्रसिध्‍दी प्रमुख प्रकाश परमार यांनी दिलेल्‍या प्रसिध्‍दीपकान्‍वये कळविल आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker