शेतकऱ्यांना वन्यजीवांपासून दहशतमुक्त करा
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

शेतकरी-शेतमजूर एल्गार परिषदेची मागणी
चंद्रपूर : वन्यजीवांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, वन्यजीवांचे मानवी जीवांवरील हल्ले वाढत आहे. मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यात अनेकांचा वाघाने बळी घेतला आहे. जंगलातील वाघ गावाच्या दिशेने येेत आहे. त्यामुळे नागरिक भीतीयुक्त जीवन जगत आहे. नागरिकनांना वन्यजीवांपासून दहशतमुक्त करण्यासाठी वनविभागाने आणि राज्यशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी, शेतमजूर परिषदेने सोमवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
वाघ, बिबट्याच्या हल्ले मानवी जीवांसह जनावरांचाही बळी जात आहे. जीवितहानीमुळे कुटुंबीयांचे तर जनावरांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वाघांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वाघ गावाच्या दिशेने येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाघ गावात येऊ नये यासाठी वनविभागाने संपूर्ण जंगल क्षेत्राला कुंपण करणे गरजेचे आहे. अन्य विकासकामांवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असताना वन्यजीव – मानव संघर्ष रोखण्यासाठी उपाययोजना का केल्या जात नाही, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी वन्यजीवांपासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी, वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला १ कोटीची मदत तसेच कुटुंबातील एकाला नोकरी, वनाधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, दोन एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना बोअरवेल, वीज मोटारपंपासहीत १०० टक्के अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमीभाव निश्चित करावा, शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्यात यावी आदी मागण्यांकडेही यावेळी लक्ष देण्यात आले.
पत्रकार परिषदेला शेतकरी, शेतमजूर एल्गार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र महाडोळे, नानाजी आदे, अमोल गुरनुले, वासुदेव गुरनुले, नंदू बारस्कर, राजेंद्र मांदाळे, होमदेव मोहुर्ले, प्रदीप वाढई, वसंत चहारे, सुरेश कापडे, मारोती शेंडे, मनोज मोहुर्ले, बालाजी निकुरे आदी उपस्थित होते.