आपला जिल्हा

भद्रावती – वरोरा मतदार संघाला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत द्या 

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

*आमदार प्रतिभा धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी*

  • चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा – भद्रावती मतदारसंघांमध्ये मागील वीस दिवसांपासून अतिृष्टीमुळे थैमान घातल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. त्यामुळे संपूर्ण खरिपाचे पीक नष्ट झालेले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले असून, शासनाने या मतदारसंघांमध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आज मंत्रालय मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

वरोरा, भद्रावती तालुक्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मशागत करून पेरणी केली होती. मात्र लागलीच पाऊस आल्याने संपूर्ण पीक नष्ट झालेले आहे. या पावसामुळे त्यांचे पीक वाहून गेले. आता त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतीच्या नुकसानीसोबतच हजारो घरांची पडझड तसेच मनुष्यहानी व पशुधन हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रभावित क्षेत्रांमध्ये अद्यापही विद्युत पुरवठा खंडित आहे. या सर्वांवर प्रभावीपणे मदत शासनाने मदत करण्यासाठी सरसकट ओला दुष्काळ जाहीर आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker