कंत्राटी नर्सेसचे जोपर्यत समायोजन करणार नाही तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसु देणार नाही – कॉ. दिलीप उटाणे
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंतर्गत कंत्राटी नर्सेस संघटना जिल्हा चंद्रपूरचा मेळावा नुकताच आयटक कार्यालय चंद्रपूर येथे पार पाडला असुन त्यामध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटी संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. दिलीप उटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र राज्याचे सरकार हे कंत्राटी नर्सेस सोबत अन्याय करीत असुन राज्य सरकारने नविन भरतीसाठी जाहिरात दिली असुन त्याठिकाणी नविन नोकरभरती करणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षापासून कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्यावर अन्याय होत आहे. एकच शैक्षणिक पात्रता असलेले व कामाचा दिर्घ अनुभव असलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडून नविन लोकाची भरती करणे हे अन्यायकारक आहे. अशाप्रकारचा कोणताही अन्याय आम्ही खपवून घेणार नाही.. यासाठी कंत्राटी नर्सेस संघटना पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारेल त्यामुळे त्याचा फटका सरकारला बसेल व सामान्य जनतेचे हाल होतील. यासाठी सरकारने नियोजन पूर्व कंत्राटी नर्सेसला सरकारी सेवेत समायोजन करून घ्यावे, अशी मागणी कॉ. दिलीप उटाणे यांनी केली.
मेळाव्यात कर्मचान्यानी विविध नागणयाविषयी चर्चा केली असून त्याच्या कामाशिवाय इतर कामे त्यांना सागण्यात येवू नये पुढील रणनिती आखण्यासाठी आयटक चे राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी माझे समायोजन माझी जबाबदारी या पध्दतीने सर्वांनी एकजूट राहून आपला लढा देण्यास आपण स्वतः सक्षम झालो पाहिजे. असे विचार मांडले.
• आयटक कार्यालय संयुक्त खदान मजदूर संघ रैय्यतवारी चंद्रपूर याठीकाणी हा मेळावा • पार पाडला असुन मेळाव्याचे अध्यक्ष स्थानी कॉ. रविंद्र उमाटे, (जिल्हा कार्याध्यक्ष, आयटक) कॉ. संगीता रेवडे, सरचिटणीस म. राज्य, कॉ. कु. बि. सी. मुन, व कॉ. सरला पारीजे, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. प्रदिप चिताडे, कॉ. अशोक यादव, कॉ. अमिता नागदेवते. (जिल्हा अध्यक्ष, गडचिरोली) अध्यक्ष वनिता मेश्राम, सचिव सुषमा शिरमैय्ये, सहसचिव शालु दुर्गे कोषाध्यक्ष ललिता मुतलवार, जिल्हा संघटक आराधना झा, महासचिव शालिनी बनकर, एम. एल. धुरीया, कु. व्हि. जि. तोकल, एस. एच. सैय्यद, एस. व्ही. कोतपल्लीवार यांच्यासोबत चंद्रपूर जिल्हयातील १५० कंत्राटी नर्सेस उपस्थित होते.