आपला जिल्हा

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतला पूरपरिस्थितीच्या आढावा*

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

*डोलारा तलाव, चिरादेवी रेल्वे भागाची केली पाहणी*

चंद्रपूर : चार दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परंतु अनेक ठिकाणी नागरिकांनी आपली घरे सोडली नाही. त्यामुळे नदी व तलावाच्या काठावरील घरातील नागरिकांना तात्काळ दुसरीकडे हलविण्याचा सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या. त्यातील १४ घरातील नागरिकांना महसूल व नगर परिषदेच्या माध्यमातून हलविण्यात आले.

काल आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी डोलारा तलाव व चिरादेवी रेल्वे भागाची पाहणी केली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार सोनवणे, नगरसेवक चंदू खारकर, नगरसेविका प्रतिभा सोनटक्के यांची उपस्थिती होती.

पूर परिस्थिती भागात वेकोलि व रेल्वे विभागाने सुद्धा मदत करण्याच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या. चोरादेवी रेल्वे पुलाखाली पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत पडली होती. ते पाणी तात्काळ रेल्वे विभागाने काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रेल्वे विभागाचे पथक याठिकाणी येऊन हा मार्ग पुन्हा रहदारीकरिता मोकळा करणार आहे. भविष्यात देखील अशा प्रकारे हा मार्ग बंद पडता कामा नये. त्याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. या भागात पूर परिस्थितीमुळे कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तात्काळ मदत करण्याच्या सूचना महसूल विभागाला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या. नागरिकांनी देखील आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker