आरोग्य व शिक्षण

समाजवादी पार्टी चे ज़िल्हाधिकारी चंद्रपुर यानां निवेदन.

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

 

 

एमपीएससी परीक्षेतून उत्तीर्ण झालेले अधिष्ठित डॉ हुमणे यांना हटवून जुनियर प्रोफेसर बनले अधिष्ठित कसे ?

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठित यांच्या तडकाफडकी बदली केल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

 संचालक संशोधन शिक्षण वैद्यकीय मुंबई व सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मुबंई यांच्या वरती भ्रष्टाचार चे आरोप करीत मुख्यमंत्री कड़े। समाजवादी पक्षाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष तनशील पठाण यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली तक्रार

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मागील ऑक्टॉबर 2020 मध्ये अधिष्ठित म्हणून रुजू झालेले एम पी एस सी परीक्षेतून उत्तीर्ण डॉक्टर अरुण हुमणे यांना नेमके काही महिन्यातच अधिष्ठित पदभरातुन मुक्त करून त्यांच्या जागी जुनिअर प्रोफेसर फक्त चार वर्षाचा अनुभव असलेल्या व एम पी एस सी नसलेले डॉ अविनाश टेकाडे यांना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन अधिष्ठित म्हणून रुजू करणारे डॉ तात्यासाहेब लहाने संचालक संशोधन शिक्षण वैद्यकीय मुंबई व सौरभ विजय सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मुबंई यांनी काही लाखाची देणगी साठी डॉ हुमणे यांना अधिष्ठित पदभरातुन कडून अनुभव नसलेल्या व एम पी एस सी उत्तीर्ण नसलेल्या डॉ. अविनाश टेकाडे यांना चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये रुजू करू घेतल्याचे आरोप शिवसेनेचे पारशिवनी तालुका अध्यक्षानी व समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष तनशील पठाण नी निवेदनातून महराष्ट्राच्या मुखमंत्र्यांकडे केली आहे. यांनी त्यात मागील तीन वर्षात डॉ मोरे यांनी किती भ्रष्टाचार केला व कोणत्या प्रकारे दर महिन्याला 15 ते 20 लाख रुपये डॉ तात्यासाहेब लहाने व सौरभ विजय यांना देणगी सोरूपात देण्याचे आरोप यात केले असल्याचे निवेदनातून स्पष्ट होत आहे.

○चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पूर्वीचे अधिष्ठित डॉ मोरे हे एम पी एस सी उत्तीर्ण नसून त्यांनी डॉ तात्यासाहेब लहाने व सौरभ विजय यांच्याशी अर्थ पूर्ण व्यवहार करून चार वर्षांच्या कालावधी भ्रष्टाचार करून पूर्ण केला कसा त्यांचे डॉ तात्यासाहेब लहाने व सौरभ विजय यांच्याशी किती आर्थिक संबंध होते या निवेदनातून स्पष्ट होतांना दिसून येते. डॉ मोरे यांनी केलेल्या करोडो च्या भ्रष्टाचाराला वाचा फुटल म्हणून डॉ. हुमणे यांना पाच महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री यांचे आदेश नसताना कसे काय बदली च्या आदेश बनावटी, जाली व फर्जी होता आणि त्यांना हटविण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली हा महत्वाचा विषय चंद्रपूर जिल्हा निवासांना समजणे गरजेचे झाले असून पुढे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विध्यार्थी यांच्या भवित्व्हाचा मोठा प्रश्न बनणार आहे. ते अश्या या भ्रष्टाचार पूर्ण मेडिकल कॉलेज मध्ये प्रामाणिक शिक्षण घेऊन तज्ञ डॉक्टर बनतील काय ? नाही तर त्यांच्या शिक्षणात व नावा पुढे फक्त नाममात्र डॉक्टर ही पदवी असणार हा गंभीर विषय असून याप्रकरणाची उच्च स्थरातून चौकशी झाली पाहिजे असे या दोनही निवेदनातून बोलल्या गेले असून ही काळाची गरज असल्याचे ही चंद्रपूर करांकडून बोलल्या जात आहे.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close