कोरोंना अपडेट्स

जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने जास्त

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

 

 गत 24 तासात 377 कोरोनामुक्त,

119 पॉझिटिव्ह

  07 मृत्यू

चंद्रपूर, दि.1 जून : जिल्ह्यात बरे होणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गत 24 तासात जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे होणारे तिपटीपेक्षा जास्त आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 377 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 119 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 7 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

आज ( दि.01) एकूण 1962 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 119 पॉझिटिव्ह तर 1843 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधीत आलेल्या 119 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 11, बल्लारपूर 31, भद्रावती 7, ब्रम्हपुरी 6, नागभिड 4, सिंदेवाही 0, मूल 7, सावली 0, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 3, राजूरा 12, चिमूर 1, वरोरा 1, कोरपना 6, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 2 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यामध्ये बल्लारपूर तालुक्यातील 51 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील घोट निंबाळा येथील 55 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील पिपरी येथील 52 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली येथील 65 वर्षीय महिला तर यवतमाळ जिल्ह्यातील इंदिरा चौक वणी येथील 62 वर्षीय महिला, तर 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 82 हजार 903 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 116 झाली आहे. सध्या 2 हजार 333 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 73 हजार 644 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 88 हजार 63 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1454 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1347, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 50, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close