आपला जिल्हा

*बेंडारा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास न्यावा*

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

*खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी*

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील बेंडारा मध्यम प्रकल्पाला वेगाने पूर्णत्वास नेऊन जलसाठा निर्माण करून परिसरातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुंबई येथे आज ३ जून २०२१ रोजी भेट घेतली.
या भागात मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. सिंचनाची सुविधा नसल्याने डोळ्या समोरील पीक हे हातातून जाते व शेतकऱ्यांचा डोळ्यात नेहमी अश्रू असतात. त्यामुळे आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचनाचा लाभ व्हावा, त्यानी आथिर्क दृष्ट्या सक्षम व्हावे म्हणून खासदार बाळू धानोरकर हे सातत्याने झटत असतात. आपल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, हे क्षेत्र सुजलाम सुफलाम व्हावे म्हणून सतत प्रयत्नरत असतात.
बेंडारा मध्यम प्रकल्पाचे धीम्या गतीने सुरु असलेल्या कामाला वेग द्यावा म्हणून खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन हा प्रकल्प जलद गतीने पूर्णत्वास न्यावा म्हणून गळ घातली. ३ हजार ९१५ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या प्रकल्पात २७.88 मिलियन क्युबिक मीटर जलसाठा राहणार असून ३०९ करोड रुपयांच्या या प्रकल्पाचा निश्चितपणे या क्षेत्रातील बळीराजाला लाभ होणार आहे.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close