ताज्या घडामोडी

व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता संयुक्त पथक गठीत

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

रीतपासणी अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 21 : जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधाने सदर व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करणे आवश्यक असून जिल्ह्यात सुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरची तपासणी करण्याकरीता जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे.

तपासणी पथकातील सदस्यामध्ये चंद्रपूरचे तहसीलदार व रामनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन रामनगर हद्द),  चंद्रपूरचे तहसीलदार व शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन,चंद्रपूर शहर हद्द), तहसीलदार व दुर्गापुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन दुर्गापुर हद्द), बल्लारपुरचे तहसीलदार व बल्लारपुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्द) तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार (चंद्रपूर व बल्लारपूर वगळून), सर्व पोलीस निरीक्षक/सहा.पोलीस निरीक्षक  संबंधित कार्यक्षेत्र असेल.

व्हिडिओ गेम पार्लर तपासणीबाबत नेमून दिलेले कामकाज : 

परवान्याच्या जागेत बदल झालेला आहे काय? परवान्यातील नमुद वेळ पाळताय काय? परवान्यात दर्शविलेल्या संख्येइतकेच मशीन परवाना स्थळी उपलब्ध आहेत किंवा कसे? परवान्याच्या स्थळी इतर काही अवैध व्यवसाय चालतात काय? या बाबी व्यतिरिक्त परवान्यातील इतर अटी-शर्तीचे भंग होत आहे किंवा कसे? याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

संयुक्त तपासणी पथकाने व्हिडिओ गेम पार्लर परवान्यात नमूद केलेल्या मुद्देनिहाय बाबींची तपासणी करून संयुक्त स्वाक्षरीनिशी तपासणी अहवाल 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावा, असे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्ह्याधिकारी विनय गौडा यांनी  निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker