आपला जिल्हा

जिल्हा स्तरावर मायनस ग्रॅन्ड निधी उपलब्ध करा:!खासदार बाळू धानोरकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

चंद्रपूर : शेतकऱ्यांचे अनेक वेळा अतिवृष्टीमुळे तर कधी कोरड्या दुष्काळा मुळे पिकांचे नुकसान होते. कधी लष्करी अळी तर कधी कोणत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाती असलेले पीक हिरावले जाते. कर्ज काढून शेती करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी कर्जबारीपणामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यामुळे शेती कौशल्य असलेल्या हजारो शेतकऱ्यांना आपण गमावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी जिल्हा स्तरावर मायनस ग्रॅन्ड निधी उपलब्ध करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

शेतकरी आत्महत्येसह ग्रामीण भागात अनेक वेळा वीज पडून अथवा विजेच्या स्पर्श लागून मृत्यू होणे, शेतातील पिकांचे पुंजने जळून वित्तहानी होणे, रासायनिक खते, ताडपत्री आगीच्या विळख्यात सापडणे अशा घटना अनेक वेळा घडत असतात. याकरिता तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी हतबल झालेल्या बळीराजाला त्यांच्या कुटुंबियांना प्रदीर्घ शासकीय प्रक्रियेत न भरडता आर्थिक मदत मिळण्याची पद्धत २०१४ पूर्वी सुरु होती, परंतु मध्यतंरी भाजप सरकारच्या राजवटीत बंद झाल्याने पूर्ववत अर्थसहाय्याची तरतूद करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
———————————–
*जळका येथील गोठ्याला वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खासदार, आमदार दाम्पत्यांची आर्थिक मदत*

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील जळका येथे गोठ्यावर वीज पडून आग लागली. या आगीमुळे पूर्ण गोठा जळला. यात भालचंद्र गारघाटे, नंदू गारघाटे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हि बाब खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा माहित होताच त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी मिलींद भोयर, विशाल बदखल, जितेंद्र मुथा, निखिल हिवरकर, अशोकराव सोनटक्के, बबन भोयर, प्रफुल असुटकर, सातपुते, मयूर वाळके, गणेश गराटे, पुरुषोत्तम उईके, बालाजी कापसे, विलास लेनगुरे, महादेव मेश्राम यांची उपस्थिती होती.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close