आपला जिल्हा

*खासदार बाळू धानोरकर यांनी मूल तालुक्यातील चिचपल्ली, नागाळा, अजयपूर, महादवाडी व गोंडसावरी या गावात गावकऱ्यांशी साधला संवाद*

*युवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा*

चंद्रपूर : गावातील तरुणवर्ग राजकारणात जास्त योगदान देतो. त्यातून एकमेकांविषयी मने कलुषित होतात आणि गावात गावाला गावपण देणाऱ्या व्यक्तीला किंवा चळवळीला बाधा निर्माण होईल, त्यापेक्षा त्याने गावाच्या उभारणीत योगदान द्यावे. सध्याच्या तरुणाई बद्दल बोलताना अनेक गोष्टींबद्दल खंत व्यक्त केली. गावोगाव लोक धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येतात तसे कालानुरूप शासकीय योजना आणि अभियानात गावाने भाग घेतला तर गावे आणि एकमेकांची मन एकत्र करण्याचे ते माध्यम आहे. स्वयंपूर्ण, सुंदर आदर्श खेडी निर्माण करण्यासाठी आपण एकत्र प्रयत्न करू मी आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून मी नेहमी आपल्या सोबत आहे. असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते मूल तालुक्यातील चिचपल्ली, नागाळा, अजयपूर, महादवारी, गोंडसावरी या गावात गावकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी कोरोना काळात गावकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधू शकलो नसल्याची खंत व्यक्त केली.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, घनश्याम येनूरकर, राकेश रत्नावार, राज यादव, नागाला येथील सरपंच रंजना पेंदोर, उपसरपंच हेमंत मोहुर्ले, पवन नीलमवार, किशोर खडसे, राजू वाढई, क्रीष्णा धोडरे, विनोद पिल्लरवार, बंडोपंत धोडरे तसेच अजयपूर येथील सरपंच नल्लुताई नलांडे, उपसरपंच बंडू निखाडे, सदस्य घनश्याम डाखरे, चिकटे, निखिल पंदीलवार, विशाल गावंडे, पुरुषोत्तम डाखरे तसेच चिचपल्ली येथील सरपंच गिरीजा आत्राम, उपसरपंच चंदन उंचेकर, रवींद्र सूत्रपवार, चरणसिग, शुभम दुर्योधन, रीना भडके, पुष्पा गेडाम, विजय नागपुरे तसेच इतर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत म्हणाले कि, महागाईने मोठ्या प्रमाणात कंबरडे मोडले आहे. उज्वला योजनेचे गाजर देण्यात आले. परंतु आता सिलेंडरचे भाव वाढवून मोठ्या प्रमाणात पैसे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील महिलांना बँकेच्या माध्यमांतून बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यात येत आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close