आपला जिल्हा

*घुग्‍घूस गावातून जाणारी कोळसा व सिमेंट वाहतुक त्‍वरित बंद करावी – आ. सुधीर मुनगंटीवार*

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

गेल्‍या अनेक वर्षापासुन घुग्‍घूस शहरातुन कोळश्‍याची व सिमेंटची वाहतुक सुरु आहे. परंतु गेल्‍या काही वर्षांपासुन या वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. त्‍याचा त्रास घुग्‍घूस वासीयांना होत आहे. त्‍यापासुन होणा-या अपघातांची शक्‍यता लक्षात घेता घुग्‍घूस गावातून जाणारी कोळसा व सिमेंट वाहतुक त्‍वरित बंद करावी असे निर्देश लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष व आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज एका बैठकीत दिले. चंद्रपूरच्‍या जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीला जिल्‍हाधिकारी मा. अजय गुल्‍हाने, जिल्‍हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, वे.को.लि. चे महाव्‍यवस्‍थापक वैरागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, कार्यकारी अभियंता सुनिल कुंभे उपस्थित होते.

या प्रसंगी आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले की, वे.को.लि. व सिमेंट या उद्योगांमुळे अपघातांमध्‍ये व रस्‍ता प्रदुषणामध्‍ये प्रचंड वाढ होते. अशा वेळी या दोन्‍ही उद्योगांनी आपले सिमेंट व कोळश्‍याची वाहने घुग्‍घूस गावातुन न नेता कोळश्‍याचे ट्रक मुंगोली माईन ते वे.को.लि. सि.एच.पी. या रस्‍त्‍याने तर सिमेंटचे ट्रक उसगाव गावाच्‍या बाहेरुन शेणगाव मार्गे पाठवावे. त्‍याच बरोबर घुग्‍घूस बायपासचे काम लवकरात लवकर पुर्ण करावे, असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

घुग्‍घूस ते साखरवाही हा रस्‍ता अतिशय खराब झाला असुन त्‍याची दुरस्‍ती त्‍वरित करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांना दिले व त्‍याचे काम लगेचच सुरु झाले, ही आनंदाची बाब आहे.

चंद्रपूर जिल्‍हयात निरनिराळे प्रकारचे उद्योग आहेत. यापैकी अनेक उद्योगांना आता वाहतुक समस्‍या भेडसावत आहे. अशा प्रकारच्‍या जिल्‍हयातील सर्व उद्योगांच्‍या वाहतुकीसंबंधी वळण रस्‍ते तयार करण्‍यासंदर्भात मा. जिल्‍हाधिकारी, मा. जिल्‍हा पोलिस अधिक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिक्षक अभियंत्‍या किंवा त्‍यांचे प्रतिनिधी यांची एक समिती नेमुन एक सर्वंकष धोरण ठरवावे असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले. खनिज विकास निधी चा उपयोग या सर्व गोष्‍टींसाठी करावा असे त्‍यांनी सुचविले. उद्योगांमध्‍ये जसा ओपनिंग व क्‍लोजर प्‍लॅन असतो तसाच मटेरियल ट्रान्‍सपोर्टचा प्‍लानही करावा असे आ. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना सुचविले.

महाराष्‍ट्र भाजयुमो उपाध्‍यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, भाजपाचे जेष्‍ठ नेते संजय तिवारी, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, माजी सरपंच संतोष नुने, साजन गोहणे, शाम आगदारी, प्रविण सोदारी व बबलु सातपुते या बैठकीला उपस्थितीत होते.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close