आपला जिल्हा

प्रॅक्टीसिंग आर्कीटेक्ट व इंजीनीअर असोशिएशन तर्फे परिसंवादाचे आयोजन

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

 


दिनांक ७ जानेवारी २०२२ शुक्रवार सायंकाळी ७.०० वाजता चंद्रपूर येथील एन डी हॉटेल येथे PAEA असोशिएशन तर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला नागपूर येथील नामवंत अभियंता श्री विवेक नाईक व त्यांचे सहकारी यांची आवर्जून उपस्थित लाभली. एसीसी सिमेंट कंपनी तर्फे  चंद्रशेखर निधोनकर, चंद्रपूरातील नामवंत निवृत्त कार्यकारी अभियंता श्री बुरांडे साहेब, प्रसिध्द कॉन्ट्रक्टर  कुंजबिहारी परमार यांची विशेष उपस्थिती होती.


सदर कार्यक्रम एसीसी सिमेंट कंपनी व प्रक्टीसींग आर्किटेक्ट अॅन्ड इंजीनीअर असोशीएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यामध्ये एसीसी सिमेंट कंपनीतर्फे त्यांच्या विविध उत्पादनाबाबत सखोल माहीती देण्यात आली तसेच विवेक नाईक यांनी अॅडव्हास कन्स्ट्रक्शन केमीकल हे नविन व जुन्या बांधकामा वेळी विविध प्रकारच्या अनुभवातुन कसे वापरावे हया बददल सविस्तर माहिती दिली. सदरील माहीतीचा असोसीएशन च्या प्रत्येक सदस्याला भरपूर लाभ मिळाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशन चे अध्यक्ष अजय पालारपवार यांनी केले. सुत्रसंचालन इंजि कुणाल वेगड व आर्की.दर्शिता वेगड यांनी केले. आभार प्रदर्शन एसीसी सिमेंटचे  चंद्रशेखर निधोनकर सर यांनी केले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी  रोहीत उत्तरवार परीनीता मेश्राम संजय झाडे सुनील उत्तरवार व जिल्ह्यातील अनेक आर्किटेक्ट व इंजिनीअर मोठ्या संखेने उपस्थीत होते. सदरील कार्येक्रमाचे प्रायोजक एसीसी सिमेंट कंपनी असल्यामुळे  अंकित बिसेन(technical service incharge),  ओजस्वीत वाघमारे(sales incharge आणि त्यांच्या संपूर्ण टिमने विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close