आपला जिल्हा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवा पिढींनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करित समाजकार्य करावे -गोंडवाना सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

स्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवा पिढींनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करित समाजकार्य करावे – माळी समाज व स्वराज्य फाउंडेशन आयोजित- यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात गोंडवाना सिनेट सदस्य प्रा निलेश बेलखेडे

 ३ जानेवारी,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व बालिका दिन निमित्त माळी समाज राजूरा यांच्या आयोजित समाज प्रबोधन व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रमात माझा माळी समाजाच्यावतीने कार्यक्रमाचे उद्घाटक राजूरा विधानसभा आमदार सुुभाष धोटे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अॅड  वामनराव चटप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अरूण धोटे, मा.जि.प. सदस्य नानाजी आदे,संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, समाज सेविका रजनी हजारे, प्राचार्य किशोर उईके,ज्योतीताई शेंडे, इंदुताई निकोडे ,प्रफुल चावरे,चेतन बोबडे,उपसरपंच कुनाल कुडे यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी उपस्थितांना प्रमुख वक्ता म्हणून सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रा निलेश  बेलखेडे यांनी मार्गदर्शन करतांना आजच्या युगात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देत फक्त एका दिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आदरांजली वाहून न राहता त्यांचे विचार, शिक्षणासाठीचे योगदान समाजप्रबोधनाच्या माध्यमातून शेवटच्या घटकांपर्यंत पोहेचवून ते आत्मसात करावे व इतरांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहावे हिच खरी त्यांना आदरांजली राहील असे विचार मांडले.युवा इतिहास अभ्यासक समीर लेनगुरे यांनी सुद्धा समाज प्रबोधन पर व्याखान केले.यावेळी सर्व मान्यवर अतिथी यांनी आप आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजक माळी समाजाचे युवा नेतृत्व स्वप्नील मोहुर्ले यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker