आपला जिल्हा

घरगुती गॅस दरवाढी विरोधात चंद्रपूर महिला काँग्रेसचे आंदोलन केंद्र सरकारचा केला निषेध

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

 


चंद्रपूर- जनविरोधी मोदी सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता हा सिलेंडर १०५३ रुपयांना महिलांना घ्यावा लागणार आहे. याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या अध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या नेतृवात आज  जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले.

मागच्या एक वर्षात केंद्र सरकारने तब्बल २१८ रुपयांची वाढ घरगुती गॅस मध्ये केली आहे. जुलै २०२१ मध्ये हाच गॅस सिलिंडर ८३५ रुपयात मिळत होता आता तो १०५३ रुपये झाला आहे. सतत गॅस सिलिंडर च्या दरात वाढ करून मोदी सरकारने महिलांची  क्रूर थट्टा केली आहे आणि त्यांना चुलीकडे वळते केले आहे. त्यामुळे आता महिलांच्या डोळ्यातील अश्रू मोदीजींना दिसत नाही का?? उज्वला गॅस च्या शुभारंभ च्या वेळी मोदी म्हणाले होते की मी महिलांचे दुःख समजू शकतो कारण माझी आई चुलीवर स्वयंपाक करायची तेव्हा धूर डोळ्यात जाऊन ती आम्हाला दिसायची नाही. ४००सिगरेटस इतका धुर महिलांच्या शरीरात चुलीच्या धुरा मुळे जातो असे ते म्हणाले होते. मग आता  इतक्या महाग गॅस दरवाढीमुळे महिला चुलीकडे वळल्या आहे तर, त्यांच्या शरीरात तो धूर जात नाही का? असा सवाल नम्रता ठेमस्कर यांनी यावेळी केला. 
उज्वला गॅस चे लाखो सिलिंडर रिकामे पडून आहे. मोदी सरकारने महिलांच्या डोळ्यात जे अश्रू दिले आहे त्याबाबद्दल मोदी सरकार ला देशातील महिला माफ करणार नाही. भाजपला फक्त घोडेबाजार करून आपली सत्ता कशी येईल याच्याशी मतलब आहे जनतेशी काही देणेघेणे नाही अशी टिका ठेमस्कर यांनी या वेळी केली. यावेळी सिलिंडर दरवाढीचा निषेध करण्यासाठी महिलांना मोळी आणि चूल भेट देण्यात आली.

या आंदोलनाला बल्लारपुर तालुका अध्यक्षा अफसाना साययद,शहर अध्यक्ष मेघा भाले, ममता चंदेल, प्रिया गेडाम, अंकू बाई भुख्या, राजुरा तालुका अध्यक्ष कविता उपरे, शहर अध्यक्ष संध्या चांदेकर,निर्मला कुडमिथे,कुंदा जेणेकर, पूनम गिरसाळवे,अर्चना गरगेलवार, शितल कातकर, लता बारापात्रे, नेहा मेश्राम, वाणी डारला,महेक सय्यद, सुरेखा चिडे, सावली शहर अध्यक्षा भारती चौधरी, अंजली दमके, नगरसेविका कविता खनके, सकीना अंसारी, रिता जैस्वाल, सीमा दुर्वे, रिता रॉय, लता निंदेकर, भारती कुडे, शालू दास, गीता माझी, कदम हलदार, कल्पना रॉय, स्मिता सिंह, कोणिका मवाली, सुचित्रा मलिक, कागज विश्वास, विमला गुप्ता, नंदा ज्येकल, बिंदू वर्मा, ममता राजभर, पदमा गड्डमवार, पदमा बडढी, राजेश्वरी जिंका, पूजा मारखंड,तुलसी मारखंड यांच्या सह महिला काँग्रेस च्या बहुतांश पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker