आपला जिल्हा

‘हद्द’….!एक मर्यादा. चंद्रपूरातील दोन ध्येयवेड्या तरुणांची चित्रपट निर्मितीत एन्ट्री.   

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 

 

 

 

      चंद्रपूरातील दोन ध्ययवेड्या तरूणांनी गमतीने पहिली मराठी चित्रपट निर्मीती सुरू केली व पाहतापाहता अनेकजण जुडत गेले आणि स्वप्न वास्तवात उतरले यामुळे सर्व आनंदाने बेभान झाले.हे दोन युवक म्हणजे देवा बुरडकर व प्रितम खोब्रागडे हे असून यांनी ‘हद्द’ एक मर्यादा,या चित्रपटाच्या निर्मीतीसाठी अहोरात्र परिश्रम घेतले.’हद्द’ चित्रपट हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट असून या चित्रपट निर्मितीचे वैशिष्ट्य म्हणजे,यातील सर्व कलावंतांनी मानधनाचीही अपेक्षा ठेवली नाही.कारण 1,2,सोडले तर सर्व कलावंत नवोदित होते परंतू त्यांचा अभिनय अप्रतिम आहे.

      सदर चित्रपटाची निर्मिती 2019 पासून झाली आणि चित्रपटाचे चित्रीकरण 90 टक्के झाल्यावर याचा ट्रेलर तयार करून 20 जानेवारी 2020 मध्ये ट्रेलरचा शानदार लोकार्पण कार्यक्रम सिध्दार्थ प्रिमीअर हॉटेलमध्ये पार पडला.तात्काकालीन पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,आमदार किशोर जोरगेवार,महापौर सौ.राखी कंचर्लावार,राहुल पावडे,ब्रिजभुषण पाझारे

यांनी उपस्थित दर्शवून भरभरून आशिर्वाद व अभिनंदन केले होते.नेमका त्याच वर्षी मार्च महिन्यानंतर प्रथमच कोरोना नामक जागतिक महामारी पसरली.यामुळे अख्ख्या देशात हाहाकार माजवल्याने संचारबंदी(लॉकडाउन)लागले.परिणामी चित्रपट थंड बस्त्यात गेला.सलग 2 वर्षांनंतर 10 जूलै 2022 रोजी चंद्रपूर येथील डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह येथे दुपारी 3 वाजता ‘हद्द’ एक मर्यादा चित्रपट बाबतीत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये चित्रपट निर्माते,तंत्रज्ञ व कलावंतांची प्रामुख्याने उपस्थिती होती.ज्यामध्ये निर्माते देवा बुरडकर,प्रितम खोब्रागडे,प्रकाश परमार,के.राजू,अमित शास्त्रकार,मनिष आंबेकर,संजय रामटेके,प्रशांत कक्कड,प्रजेश घडसे,प्रकाश वाघमारे,शुभम भगत,मनोज तोकला,शंकर दास,ज्योत्स्ना निमगडे,प्रदीप निमगडे,राजेंद्र वालदे,मृणाल कांबळे,रमेश तांडी,विजय भानसे,नरेश बुरडकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.चित्रपटातील तांत्रिक व काही अल्प त्रुटीचे निरसन करून येत्या ऑक्टोबर महिन्यात समस्त जनते समोर लोकार्पण होईल.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख प्रकाश परमार यांनी एका पत्रकान्वय दिली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker