आपला जिल्हा

खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

सिकंदराबाद – कागजनगर पर्यंत चालणारी भाग्यनगरी ट्रेन न. १७२३३ बल्लारपूर पर्यंत चालणार

चंद्रपूर : जिल्ह्याच्या भांदक रेल्वे स्थानकावर हेद्राबाद – निजामुद्दिन दक्षिण एक्स्प्रेस ट्रेन नं. १२७२१/२२ व चंद्रपूर रेल्वे स्थानकावर चंदीगड – मदुराई एक्स्प्रेस ट्रेन नं . १२६८८/८७ ला थांबा मंजूर केल्याबद्दल खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी भारत सरकार यांची रेल्वे मंत्रालय दिल्ली येथे भेट घेऊन आभार मानले व इतर मागण्यांची देखील लवकरच पूर्तता करावी अशी आग्रही मागणी केली. 

              सिकंदराबादवरुन – कागजनगर पर्यंत चालणारी भाग्यनगरी ट्रेन. नं. १७२३३ बल्लारपूर पर्यंत सुरु करण्याची मागणी मंत्रिमहोदयांनी मान्य केली असून लवकरच याबाबतचे आदेश रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात येणार असल्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.

तसेच चांदा फोर्ट च्या पूर्वीच्या रेल्वे स्थानकाच्या रिक्त जागेत चंद्रपूर रेल्वे जंक्शन निर्माण करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. काझीपेठ पुणे एक्स्प्रेस ट्रेन नं. २२१५१/ ५२ आठवड्यातून तीन दिवस चालविणे व बल्लारपूर लोकमान्य टिळक टर्मिनल ट्रेन नं. ०११२७/०११२८ दररोज चालविण्याच्या मागणीवर देखील रेल्वे मंत्र्यांनी तिसऱ्या लाईनचे काम पूर्णत्वास गेल्यावर या मागण्या देखील पूर्ण करणार असल्याचे सांगत या मागण्यांना देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. यासह अन्य अनेक मागण्यांची पूतर्ता करण्याचे आश्वासन दिले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker