घर बांधकामापूर्वीच ३० लाख रुपये घेऊन कंत्राटदार फरार
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

सेवानिवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याच्या पत्नीची कंत्राटदारासह दोघांविरुद्ध दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार
कंत्राटदार शिवनाथ डाहुले.
चंद्रपूर : वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने घर बांधकामासाठी एका कंत्राटदारासोबत घर बांधकामाचा ४५ लाखांत करार केला. यानंतर कंत्राटदाराने विश्वासात घेऊन घर बांधकामापूर्वीच ३० लाख रुपये घेतले. मात्र, यानंतर तो घर बांधून देण्यास टाळाटाळ करू लागला. विचारणा केल्यानंतर तो जिवे मारण्याची धमकी देत होता. मात्र, मागील काही दिवसांपासून त्याने शहरातून पोबारा केला असून, फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याच्या पत्नीने दुर्गापूर पोलीस ठाण्यात कंत्राटदारासह अन्य दोघांविरुद्ध लेखी तक्रार दिल्याची माहिती पीडित कुटुंबीयांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित परिषदेत दिली.
निखिल गजानन देशमुख
पिडीत कैलास तलारी त्यांचा कुटुंब
कैलास तलारी हे वेकोलितून सेवानिवृत्त झाले. त्यांना काही रक्कमही मिळाली होती. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय घर बांधण्याच्या विचारात असताना राकेश नांदे आणि निखिल गजानन देशमुख या दोघांनी शिवानाथ डाहुले या कंत्राटदाराची भेट घडवून दिली. तलारी कुटुंबीयांनी शिवनाथ डाहुले यांच्यासोबत घर बांधून देण्याचा करार केला. पंरतु, कंत्राटदाराने घर बांधकामापूर्वीच ॲडव्हान्स म्हणून ७ लाख ८८ हजार रुपये घेतले. यानंतर दुसरा धनादेश १५ लाखांचा घेतला. आणि सिमेंट, गिट्टी, लोहा महाग होईल त्यामुळे पूर्वीच बुकिंग करून ठेवावा लागतो असे सांगून ७ लाख १२ हजाराचा तिसरा धनादेश घेतला. परंतु, घराचे बांधकाम सुरू केले नाही. वारंवार तो टोलवाटोलवी करू लागला. यामुळे कैलास तलारी डिप्रेशनमध्ये गेले असून, कुटुंबीयांनाही मानसिक धक्का बसला आहे. ज्या राकेश नांदे आणि निखिल गजानन देशमुख यांच्या माध्यमातून व्यवहार झाला. त्या दोघांनीही हात वर केल्याने या दोघांचाही या फसवणुकीत सहभाग असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीतून केला आहे.
संपूर्ण आयुष्याची जमापुंजी घेऊन कंत्राटदाराने पोबारा केला. घरही नाही आणि पैसेही नाही अशी अवस्था झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. दुर्गापूर पोलिसात विजया कैलाश तलारी यांनी तक्रार केली आहे. मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आरोपीवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी तलारी कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केली आहे.