74 वी संविधान शाखा संपन्न.
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*
11 जून 2023 ला राजीव गांधी उद्यान, पाठनपुरा गेट जवळ सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट द्वारा आयोजित 74 वी संविधान शाखा सकाळी 7:30 ते 9 वाजे दरम्यान संपन्न झाली. यात शिक्षण, रोजगार, स्वास्थ्य, सामाजिक सौहार्द, जीवघेणी महागाई, महाग होत असलेले शिक्षण, सरकार द्वारा इंग्रज सरकारच्या मुखबिराचे होत असलेले उदात्तीकरण, सत्ताधारी राजकीय पक्षाकडून संविधानाला अपेक्षित धर्म निरपेक्ष नागरिक घडवीन्या ऐवजी धर्मांध व जात्यांध नागरिक घडविण्याचा जाणूनबुजून होत असलेला प्रयत्न ई विविध विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली.
लोकशाही मध्ये नागरिकांनी प्रश्न सत्ताधारी पक्षातील नेते, मंत्री, आमदार, खासदार ई ना विचारावे असे आवाहन करण्यात आले. संविधान शाखेला सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे, संघटक, भास्कर मुन, अशोक म्हस्के, सूर्यभान झाडे, भास्कर डांगे ई नी मार्गदर्शन केले. परिसरातील स्त्री पुरुष, युवक मिळून 50 वर सुजाण नागरिक उपस्थित होते.
शेवटी संविधानाच्या उद्धेश पत्रिकेचे सामूहिक वाचन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लुहिलेल्या राष्ट्रवंदनेचे सामूहिक वाचन करून स्वतःचा परिचय देत संविधान शाखेचा समारोप करण्यात आला. राजीव गांधी उद्यान पाठनपुरा गेट जवळील 11 मे च्या संविधान शाखेच्या यशस्वी आयोजणासाठी मोंटू मानकर व आकाश चहारे यांनी विशेष प्रयत्न केले.
पुढील 75 वी संविधान शाखा परत राजीव गांधी उद्यान, पाठनपुरा गेट जवळ येथेच रविवार दि 18 जून 2023 ला सकाळी 7 वा घेण्याचे ठरले.