आपला जिल्हा

*उमेद अभियानामध्ये कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्तीचें मानधन द्या*

✍🏻 ✒️🖋️ *हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *बातमी और जाहिरात के लिए संपर्क करे* 📞 📲 *8975250567*/ *93253328553*

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी*

चंद्रपूर : ग्राम विकास विभागाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये वरोरा – भद्रावती मतदार संघात ३०० समुदाय संसाधन व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांना अभियानाकडून मासिक मानधन दिले जाते परंतु त्यांना माहे एफिल २०२० पासून मानधन मिळालेले नाही. सादर समुदाय संसाधन व्यक्ती कोरोना महामारीचा काळात सुद्धा जनजागृती, माक्स तयार करणे लसीकरण यासोबतच अभियानाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी काम करीत होते. तरीदेखल त्यांना अद्याप मानधन मिळालेले नाही. त्याकरिता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः मुंबई येथे जाऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन हा लोकहितकारी विषय लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.
त्यासोबतच त्यांनी या कर्मचाऱ्यांना मागील दीड वर्षांपासून कोणतेही मानधन प्राप्त न झाल्याने त्यांना काम करतांना अडचणी येत आहेत. जिल्हा स्तरावर विचारणा केली असता राज्य स्तरावरून निधी प्राप्त झाल्या नसल्याचे समजले हि बाब मंत्री महोदयांच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिली. मंत्री महोदयांनी देखील याबतीत त्वरित निर्णय घेऊन हा प्रश्न निकाली काढला जाईल असे आस्वासन दिले.
—————————————————————————————————-
*ग्रामीण भागातील पथदिव्याचे बिल जिल्हा परिषदेने भरावे*

*आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी*

चंद्रपूर : ग्रामीण भागात पथदिव्यांचे बिल आधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येत होते. परंतु मार्च महिन्यातील पथदिव्यांचे बिल भरणा करण्याकरिता जिल्हा परिषदला न देता ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येकी ग्रामपंचायतीला चार ते पाच लाख रुपयांचा घरात हे बिल आले आहे. त्यामुळे हे बिल भरायचे कसे असा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे पडला आहे. हे बिल जिल्हा परिषदेने भरावे अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुंबई येथे भेट घेऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
कोरोना मुळे सर्वच ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाच्या विकासाला ब्रेक लागल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. त्यातच निधी नसल्यामुळे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. त्यातच पथदिव्यांचे चार ते पाच लाखांचे बिल आल्याने मोठे संकट त्यांच्यावर कोसळाचे आहे. महत्वाचे म्हणजे हे बिल भरायचे झाल्यास सामान्य फंडातून हे बिल भरावे लागते परंतु सामान्य फंदात कोणताच निधी शिल्लक नसल्याने करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावाजवळ जंगल भाग आहे. मोठ्या प्रमाणात या परिसरात प्राणी हे गावात येऊन माणसाला मारल्याच्या घटना पुढे येत आहे. अशा परिस्थितीत वीजवितरण कंपनीने हि वीज कापली तर मोठे संकट येणार आहे. सादर वीज बिल भरण्यासाठी २४ तासाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे. त्यामुळे सदर परिस्थती लक्षात घेता पथदिव्यांचे बिल पूर्वी प्रमाणे जिल्हा परिषदेने भरून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

शेअर करा
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या वेबसाईट वरील बातम्या ,लेख,फोटो कॉपी करू नये.
Close
Close