आपला जिल्हा

आदिवासी गोंडगोवारी बांधव १४ डिसेंबर रोजी विधानभवनावर धडकणार

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

विविध मागण्यांकडे वेधणार लक्ष

चंद्रपूर : गोंडगावारी जमातीला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १४ डिसेंबर रोजी आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास विभागमध्ये दिलेल्या निर्णयाच्या अधिन राहून संविधानिक तरतुदीनुसार, गोंड गोवारी जमातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठीचे आदेश जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना देण्यात यावे, गोंडगोवारी जमातीच्या लोकांना निर्गमित करण्यात आलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना अनुसूचित जमातीचे इतर सर्व लाभ आणि रोखलेले पदवी प्रमाणपत्र शिष्यवृत्ती मंजूर करून तत्काळ देण्यात यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पत्रुजी नागोसे, विलास राऊत, केशव सोनवाणे, शंकर नेवारे, संदीप सहारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker