आपला जिल्हा

ताडोबाला जागतिक स्तरावर पोहचविण्यात योगदान देणा-यांचा ताडोबा महोत्सवात सन्मान करा – आ.किशोर जोरगेवार

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांना सूचना

जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर पोहचविण्यास वन्यप्राणी छायाचित्रकार, पत्रकार, वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी व जंगलांचे संरक्षण करणारे स्थानिक नागरिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे चंद्रपूरात आयोजित ताडोबा महोत्सवात त्यांचा सत्कार करण्यात यावा अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वनसंरक्षक तथा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांना केल्या आहे. सदर पत्रही त्यांनी पाठवले आहे.

      वन विभागाच्या वतीने ताडोबा महोत्सव २०२४ चे आयोजन १ मार्च ते ३ मार्च २०२४ दरम्यान करण्यात आले आहे. ताडोबा महोत्सव 2024 चे उद्दिष्ट ताडोबाची यशोगाथा साजरी करणे आणि ती जागतिक मंचावर प्रकाशित करणे हि आहे. मात्र सदर महोत्सव साजरा करत असतांना ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील प्राण्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेर्यात टिपून येथील सौंदर्य जगात पोहोचविणार्या वन्यजीव छायाचित्रकरांचा विसर पडता कामा नये. त्यासोबतच अनेक पत्रकार वृतांकनच्या माध्यमातून ताडोब्याच्या प्रसिद्धीसाठी काम करीत आहे. तसेच वन्यजीव संस्था वन विभागातील कर्मचारी – अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून वन्य प्राणी संरक्षणाचे ईश्वरीय कार्य करीत आहे. येथील स्थानिक नागरिकांनी या वनसंपत्तीचे संरक्षण केले आहे. यांच्या एकत्रित योगदानामुळेच आज ताडोबा व्याघ्रप्रकल्प जागतिक स्तरावर पोहचले आहे. या सर्वांच्या सामुहिक योगदानाशिवाय ताडोबा महोत्सवाची संकल्पनाच अपुरी राहील त्यामुळे अश्या आयोजनात ताडोबाच्या प्रसिद्धीत, संरक्षणात उल्लेखनीय योगदान असलेल्या या सर्व घटकांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या सेवाकार्याची पावती देण्यात यावी अशा सूचना त्यांनी क्षेत्र संचालक डाॅ जितेंद्र रामगावकर यांना पाठविलेल्या पत्रातुन केल्या आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker