विर्दभातील आरोपीचे ब्रेक द चेन आटोक्यात
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

दिनांक ०१/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे निलम देशपांडे, वय ३३ वर्ष, रा. गुलमोहर कॉलनी, चंद्रपुर हया रात्रौ ९:०० वाजता दरम्यान तिच्या कामावरून मोपेड गाडीने घरी परत जात असतांना गुलमोहर कॉलनी रोडवर एक पांढ-या रंगाची मोटार सायकल ज्यावर बसलेला इसम याने मागुन येवुन फिर्यादीचे गळ्यामधील ४.५ ग्रॅम वजानाची सोन्याची चैन किमंत २०,०००/- रु. जबरदस्तीने हिसकावुन नेले अशी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन, रामनगर येथे अप.क्र. ३३०/२०२३ कलम ३९२ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
तसेच दुसरे दिवशी दिनांक ०२/०४/२०२३ रोजी नामे रंजना उत्तम वैद्य रा. सिस्टर कॉलनी, चंद्रपुर ही सकाळी ०५:३० वाजता दरम्यान रहमदनगर रोडवर वॉकींग करीत असतांना एक पांढ-या रंगाची मोटार सायकल ज्यावर बसलेला इसम हा मागुन येवुन गळयामधील मंगलसुत्र जबरदस्तीने हिसकावुन नेली अशी तक्रार प्राप्त झाली. त्यांनंतर दिनांक ०६/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे विकास रामचंद्र बलकी रा. रेव्हेन्यू कॉलनी, चंद्रपुर हे आपले पत्नीसह मोपेड गाडीने सकाळी ५:०० वाजता दरम्यान मंदिराकडे जात असतांना एक पांढ-या रंगाची मोटार सायकल ज्यावर बसलेला इसम हा मागुन येवुन गळ्यामधील मंगलसूत्र जबरदस्तीने हिसकावुन नेली अशी तक्रार प्राप्त झाली.
चंद्रपुर शहरात तसेच पोस्टे रामनगर हद्दीत वारंवार होत असलेल्या चैन स्नॅचिंग गुन्हयाचे • गांर्भीर्य बघता गुन्हे शोध पथक, रामनगर येथील डी. बी. येथील अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल होवुन घटनास्थळाचे आजु-बाजुच्या परिसरातील गोपनिय बातमिदार तसेच सी.सी.टि.व्हि. फुटेज चेक केले असता, चैन स्नॉचिंग करणा-या अज्ञात आरोपीची तसेच त्याचे मोटार सायकलची ओळख पटली नाही.
सदर घटनांचे अनुषंगाने अज्ञात आरोपीचे गुन्हे करण्याचे पद्धती नुसार पोलीस निरीक्षक राजेश मुळे, ठाणेदार रामनगर याचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक येथील सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार यांचे वेगवेगळे तिन पथक तयार करून सतत ६ ते ८ दिवस रोज सकाळी ०४:०० वाजता ते ०६:०० वाजता दरम्यान चंद्रपुर शहरात प्रवेश करणारे मार्ग रहमदनगर, एम.आय.डी.सी. तसेच पठाणपुरा येथे सतत फिरून साध्या पोषाखात पाळख ठेवुन (सापळा रचुन ) गोपनीय बातमिदार नेमण्यात आले होते.
त्यानंतर दिनांक १४/०४/२०२३ रोजी पहाटे दरम्यान नेहमी प्रमाणे सापळा रचुन असतांना • गोपनिय बातमिदाराकडुन माहिती मिळाली की, एक पांढ-या रंगाची गाडी ज्यावर एक इसम हेलमेट लावुन पठाणपुरा कडुन चंद्रपुर मध्ये प्रवेश केला असल्याचे माहिती वरून नमुद आरोपीचा चंद्रपुर शहरात शोध घेवून पाठलाग केला असता, नमुद अज्ञात आरोपी हा एम.आय.डी.सी. पडोली रोडने अतिशय भरधाव वेगाने जात असतांना सपोनि हर्षल ओकरे हे चार चाकी वाहनाने पाठलाग करून त्याचे मोटार सायकल मागुन ठोस मारली असता, अज्ञात इसम मोटार सायकल घेवुन रोडचे बाजुला पडला. त्यावेळी अंधाराचा व जंगलाचा फायदा घेवुन ताराचे कुंपनामधुन पडुन जात असतांना नापोशि/ किशोर वैरागडे व सपोनि हर्षल अकेर हे त्याचा पाठलाग केला परंतु मिळुन आला नाही. त्यावेळी अज्ञात आरोपीची मोटार सायकल व हेलमेट ताब्यात घेवुन त्याचा परिसरात शोध घेतला असता, अनोळखी अज्ञात इसम हा एम.आय.डी.सी. चे जंगलामध्ये त्याचे अंगावरील निळ्या रंगाचे अपर, लोअर पॅन्ट काढुन ठेवले पॅन्टची -तपासणी केली असता, पॅन्टमध्ये मिरची पावडरचे पॉकेट मिळाले.
घटनास्थळी मिळालेली बजाज प्लसर मोटार सायकलचा तसेच इतर माहिती प्राप्त करून पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात पोउपनि सामलवार सह टिम तयार करून आंध्रप्रदेश, तेलंगना रवाना करण्यात आले. तपास टिम आंध्रप्रदेश विजयवाडा येथे जावुन अज्ञात आरोपी बाबतची काही उपयुक्त माहिती प्राप्त करून चंद्रपुर येथे परत आले. त्यानंतर गोपनिया बातमिदार यांनी दिलेल्या माहिती वरून जिल्हा वर्धा येथील शांतीनगर, तिरूपती अपार्टमेंट येथील एक खोली मध्ये जावुन आवाज दिला असता एक महिला घराबाहेर आली. तिने कोण आहे असे विचारली असता, पोलीस असल्याचे सांगितले वरून नमुद महिला हिने घरामधील लाईट बंद करून आरडा ओरड करणे सुरू केले. त्याचे वेळी पोउपनि सामलवार यांनी स्थानिक पोस्टेला संपर्क करून पोलीस स्टॉफ बोलाविले. नमुद महिलेस विश्वासात घेवुन दरवाजा उघडण्यास लावले. सदर खोली मध्ये इसम आरोपी नामे सुरज श्रीराम शेट्टी (कोरवन) यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिले वरून नमुद • आरोपी कडुन गुन्हयात जबरदस्तीने हिसकावुन नेलेले सोन्याचे मंगलसूत्र, सोन्यची चैन असा एकुण १,३८,६००/- रुपयचा माल जप्त करण्यात आले.
नमुद आरोपीस अधिक विचापुस केली असता, त्याचेवर राज्य तेलंगना, आंध्रप्रदेश येथे १६ गुन्हे घरफोडीचे तसेच नागपुर व आदिलाबाद येथे चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल करण्याचे निष्पन्न झाले आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी, सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस, निरीक्षक राजेश मुळे, मपोनि लता वाढीवे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो. हवा. रजनीकांत पुट्ठावार, पोहवा / २४५४ प्रशांत शेंदरे, नापोशि/ १२२९ विनोद यादव, नापोशि/ ११७६ किशारे वैरागडे, नापोशि/ २१८२ चिकाटे, नापोशि/ मिलींद दोडके, नापोशि/ ११६५ आनंद खरात, नापोशि/ ९१७ निलेश मुडे, नापोशि/ सतिश अवथरे, नापोशी / २४३० लालु यादव, पोशि/२५१३ विकास जुमनाके, पोशि/८२५ हिरालाल गुप्ता, पोशि/८८१ संदिप कामडी, पोशि/६९९ विकास जाधव, मनापोशि/ भावना रामटेके तसेच सायबर सेल, चंद्रपुर येथील नापोशि/प्रशांत लारोकर, नापोशि/ छगन जांभुळे, पोशि/अमोल सावे यांनी केलेली आहे.