क्राईम

गणेश उत्सवाचे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर ने 3 दीवसात दुसरी कारवाई करुन देशी बनावटीचे अग्नीशस्त्र केले जप्त

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

चंद्रपूर:-गणेश उत्सवाचे दरम्यान समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भयमुक्त गणेश उत्सव या संकल्पनेतुन पोलीस अधिक्षक चंद्रपूर यानी अवैधरीत्या शस्त्र व अग्गीशस्त्र बाळगनारे गुन्हेगारा विरुध्द विशेष मोहीम राबवीन्याचे दिलेल्या निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोउपनि अतुल कावळे यांचे पथक तयार करून, दि. 22/09/2023 रोजी पो.स्टे विरुर हदिदत कोहपरा गावातील अमर रमेश आत्राम हा इसम वय अंदाजे 19- 20 वर्ष हा आपले राहते घरी अवैधरीत्या अग्नीशस्त्र बाळगुन आहे अश्या खबरेवरून कारवाई करत आरोपी नामे अमर रमेश आत्राम, वय 19 वर्षे, रा. कोहपरा ता. राजुरा जि. चंद्रपुर याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र कि 10,000 /- रू व एक एन्डरोइड मोबाईल कि. 10,000/- रू. असा असा एकुण 20,000/- रू. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

तसेच यापुर्वी दि. 18/09/ 2023 रोजी पोस्टे राजुरा येथे आरोपी नामे राजरतन राहुल बनकर, वय 18 वर्षे रा विहीरगाव ता राजुरा जि. चंद्रपुर याचे कडुन एक देशी बनावटीचे अग्नीशस्त्र व 1 जिवंत काळतूस व मोबाईल जप्त करुन आरोपी विरुद्ध पोस्टे राजुरा येथे अप 509 / 23 कलम 3 ,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

यातील आरोपी नामे अमर रमेश आत्राम, वय 19 वर्षे, रा. कोहपरा ता. राजुरा जि. चंद्रपुर विरुद्ध आज दि. 22/09/2023 रोजी पोस्टे विरुर येथे कलम 3 ,25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी  पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलीस उप निरीक्षक अतुल दिनायक कावळे, पो.ना अनुप डागे, जमिर पठाण ,नितेश महात्में, मिलींद चव्हान पो.शि प्रसाद धुळगंडे ,चा.ना.पो दिनेश अराडे सर्व स्था.गु.शा. चंद्रपुर यांनी केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker