ताज्या घडामोडी

कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३) भादवी सहकलम ४, ६ पोक्सो गुन्हयातील आरोपीस जन्मठेप शिक्षा.

*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

 दिनांक ०६/०८/२०२०२१ रोजी पोलीस स्टेशन मुल हद्दीतील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपीने जबरीने लैंगीक अत्याचार केला यातील आरोपी विरुध्द दिनांक ०९/०८/२०२१ रोजी २४ वर्षीय आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक ३८४/२०२१ कलम ३७६ (२) (एन), ३७६ (३),५०६ भादवी सहकलम ४,६ लैंगीक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हयाचा तपास पोउपनी राजश्री रामटेके यांनी करून आरोपी विरुध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. दिनांक १७/०२/२०२४ रोजी मा कोर्ट विद्यमान अनुराग दिक्षीत विशेष सत्र न्यायाधिश चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी मार्गेश्वर किशोर मेश्राम वय २३ वर्ष यास जन्मठेप व ५००० रू. दंड, दंड न भरल्यास १२ महीने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन महिला पोलीस परवीन पठाण ब.न.८३ पोस्टे मुल यांनी कामगीरी बजावली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker