अवैधरित्या कत्तलीकरीता घेवुन जाण्याऱ्या ट्रक वर कारवाही करत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली ३१ गोवंशाची सुटका
*हिमायूँ अली(मुख्य संपादक-RTI NEWS.)* *खबर और जाहिरात देने के लिए संपर्क करे* *8975250567*

अवैधरित्या होण्याच्या गोतस्करीवर कारवाही करन्याचे पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी निर्देश दील्याने स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी / कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून त्यांना योग्य त्या सुचना देवुन कार्यवाही करत..
गुप्त बातमिदारा कडुन मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन मुल वरुन एका वाहनाचा पाठलाग करुन व चंदपुर कडुन राजुरा कडे जानारा रोडवर हडस्ती गावात नाकाबंदी करुन संशयीत वाहन थांबवन्याचा इशारा केला असता तो पोलीसांना पाहुन गाडी न थांबवता पळु लागला व धोकादायक रित्या गाडी चालवुन हडस्ती गावातील रोडवरील इलेक्टीक पोल ला रमोरुन टक्कर मारून सदर टॅक मधील चालक अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. सदर वाहनाची पाहनी केली असता वाहनामध्ये एकुण जिवंत गोवंश ३१ ( बैल / गोरे / गाय ) निर्देयतेने कोंबलेले व त्यांचे पाय मान यांना दोरीने बांधुन, चारा पाण्याची कसचीच व्यवस्था नसलेले दिसले त्यावररून अशोक लेलॅन्ड कंपनीचे ०६ चक्का ट्रक क्रमांक MH 34 BZ 0210 वाहनातील गोवंश/जनावरे यांना कत्तलीकरीता घेवुन जात असल्याने सदर ट्रक जप्त करुन एकुण गोवंश ३१ ज्यात ( ०७ गोरे, ०४ बैल व २० गाय ) यांना पालनपोषण, औषध उपचार व देखभाल करीता नगर परिषद कोंडवाडा / गोशाळा, राजुरा ता. राजुरा जि. चंद्रपुर येथे दाखल करन्यात आले.
सदर कारवाहीत ३१ गोवंश अंदाजे किंमत २,७७,०००/रू व आरोपी वाहन क MH 34 BZ 0210 किमती अंदाजे १०,००,०००/- असा एकुण १२,७७,००० /- रू चा माल पंचनाम्याप्रमाने पंचा समक्ष जप्त करुन आरोपी वाहन चालक यांचे विरूदध पो.स्टे चंद्रपुर शहर येथे अप.क्र. २३४ / २०२३ कलम ११ (१), (ड) प्रा. नि.वा. कायदा १९६०, सहकलम ५ अ (१), ५ ब, ९,११ महा. प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३,१३० / १७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पो. स्टे चंद्रपुर शहर करित आहे.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, पो.उप.नि. अतुल कावळे, पो हवा स्वामीदास चालेकर, पो हवा महंतो, नापोशि दिपक, गणेश, अनुप, मिलींद नितेश पोशि गणेश, विनोद, मयुर, गोपिनाथ, चालक नापोशि दिनेश सर्व स्थागुशा चंद्रपुर यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.