महूद रेल्वे गेट, मिरज रोड येथील भुयारी मार्गाचे काम दर्जेदार करण्यात यावे
रेल्वे गेटवरील गतिरोधकाची उंची कमी करावी :-अशोक कामटे संघटना

सांगोला : मिरज रोड रेल्वे बोगदा , महूद रेल्वे गेट(31B ) येथील दुरुस्तीची कामे दर्जेदार करावीत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने पंढरपूर येथील मध्य रेल्वे विभागाचे अभियंता यांच्याकडे केली आहे.
सुरुवातीस महूद रोड येथील काँक्रीटीकरण काम ते भविष्यकाळात टिकाऊ होण्याकरता दर्जेदार होणे गरजेचे आहे तसेच येथील तयार केलेली गतिरोधकमुळे वाहनांचे अपघात, नुकसान सातत्याने या ठिकाणी होत आहे, येथील गतिरोधकाची योग्य उंची ठेवून व रुंदी वाढवून त्याची पुन्हादुरुस्ती करण्यात यावी तसेच मिरज रोड येथील भुयारी मार्गात अनेक खड्डे पडले आहेत , मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाळ्यात पाण्याची तळी बनली होती , येणाऱ्या पावसाळ्यात वाहनधारकांना व पादचाऱ्यांना त्रास होऊ नये याकरता त्याचा निचरा योग्य होण्याकरिता रेल्वे प्रशासनाने व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी कामटे संघटनेने रेल्वेचे अभियंता अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे त्यांनी लवकरच या सर्व समस्यांचा निपटारा करू असे आश्वासन शहीद अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले आहे.