सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागात छ. शिवाजी महाराज चौका लगत असलेल्या धान्य बाजारात नगरपालिकेच्या खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून फोटोचा जुगाराचा धंदा जोमात
सांगोल्याचे पोलीस यावर नेमकी कोणती कार्यवाही करणार? याकडे शहर वासियांचे लक्ष

सांगोला :सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज चौका लगत असलेल्या धान्य बाजारात नगरपालिकेच्या खुल्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून फोटोचा जुगाराचा धंदा जोमात सुरू असून या फोटोच्या जुगारांमध्ये अनेक जण कंगाल झाले आहेत. या फोटोच्या जुगारावर कारवाई करण्याचे धाडस सांगोल्याचे पोलीस करतील काय? अशी विचारणा शहवासीयांतून केली जात आहे.
हीच ती जागा ज्या ठिकाणी फोटोचा जुगार चालू आहे
सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा फोटोचा जुगार सुरू असताना यावर कोणचाच धाक अथवा कोनीही फिरकत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सदरील जागा ही नगरपालिकेच्या मालकीची असून शासकीय जागेमध्ये अशा प्रकारचा जुगाराचा अड्डा बिनबोबाटपणे चालू असल्याने यात काहीतरी गौडबंगाल असल्याची ही चर्चा नागरिकांतून केली जात आहे.
फोटोचा जुगार हा गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील अनेक व्यापारी तसेच काही ठराविक जण हा फोटोचा जुगार खेळत असून या फोटोच्या जुगारांमध्ये दररोज लाखो रुपयाची उलाढाल असून हा जुगार तात्काळ बंद करावा.शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचे धंदे सुरू असून सांगोल्याचे पोलीस यावर नेमकी कोणती कार्यवाही करणार ? याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.