रोजगार मेळाव्यातून ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या वतीने 1३० उमेदवारांची प्राथमिक निवड
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर -8975250567

स्थानिक उद्योगांमध्ये स्थानिक बेरोजगार युवकांना प्राथमिकतेने रोजगार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. या युवकांच्या कौशल्याला अधिक वाव मिळत त्यांच्या आर्थिक व कुशल उन्नतीचा मार्ग अधिक सुकर व्हावा या पूरक हेतूने नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती व चंद्रपूर येथे आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनाच्या माध्यमातून ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या वतीने 1३० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आल्याची माहिती महाप्रबंधक रवि चावरे यांनी दिली.
सदर मेळाव्याच्या माध्यमातून उद्योगाला एकाच मंचावर विविध पदांसाठी अनेक होतकरू तरुणांची निवड करता आली. नव्या पिढीच्या या उमेदवारांच्या माध्यमातून उद्योगातील वैविध्यपूर्ण कार्यात नक्कीच एक नवी जोड मिळेल असा सार्थ विश्वास यावेळी प्लांट हेड अविनाश डोंगरे यांनी व्यक्त केला. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेल्या युवकांचे अभिनंदन करीत या स्तुत्य उपक्रमाबद्दल शासनाचे आभार यावेळी डोंगरे यांनी व्यक्त केले.
आज जिल्ह्यातील उद्योगांमध्ये विविध क्षेत्रात अनेक होतकरू युवकांची गरज आहे. पूरक शिक्षण व कौशल्य असेल तर प्रत्येक युवकांना आज रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून घेता येईल. स्थानिक युवकांनी उद्योग रोजगार पूरक शिक्षण घ्यावे असे आवाहन यावेळी उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋिषभ मित्तल यांनी केले.
रोजगार मेळवाच्या माध्यमातून युवकांची निवड करण्याची धुरा ओमॅट वेस्ट लिमिटेड सर्वश्री महाप्रबंधक मनीष वडस्कर, महाप्रबंधक सतीश मूलकलवार, महाप्रबंधक अमरेंद्र सिंह ठाकूर, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, दिपक पराळे, जयंत गाडेकर, मृत्युंजय सिंह, विजय कनोजे, आनंद मिश्रा, शुभम तंबोली, स्वप्नील देशमुख, खुशाल गावंडे यांनी सांभाळली.