ताजे अपडेट
पाऊस थांबल्यानंतर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण
मुख्य संपादक - हिमायुँ अली,मोबाइल नंबर -8975250567

📝 गोंडपिपरी तहसीलदारांचे स्पष्टीकरण
चंद्रपूर, दि. 28 मे : ‘घरकुल लाभार्थी दिवसभर थांबून रिकाम्या हाताने परतले’ याबाबत गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, गत तीन चार दिवसांपासून गोंडपिपरी तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे. त्यामुळे मंजूर घरकूल लाभार्थ्यांना वाळू वितरण करतांना अडचण निर्माण होत असून पाऊस थांबल्यानंतर आणि रस्ते पुर्ववत झाल्यानंतर मंजूर घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण तात्काळ सुरू करण्यात येईल, असे गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बाहेकर यांनी स्पष्ट केले आहे.