
सोलापूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. 4 मार्च 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर येथे करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.
सदर दिवशी जनतेच्या तक्रारीबाबत संबधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी उपस्थित रहावे. तसेच मागील महिन्यातील प्रलंबित अर्ज, निवेदने, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकारवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही आदी माहितीसह संबधितांनी वेळेत उपस्थित रहावे. तसेच सदर दिवशी गैरहजर राहणार असल्यास त्याबाबत मा. जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे असेही निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.