दादर -सातारा -दादर रेल्वे दररोज धावण्याकरता कामटे संघटनेच्या मागणीनुसार सकारात्मक प्रयत्न करणार:- खा.धैर्यशील मोहिते- पाटील
सांगोला : शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशीलभैय्या मोहिते- पाटील यांचा सत्कार उत्साही वातावरणात करण्यात आला.
सुरुवातीस नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते -पाटील यांना शहीद अशोक कामटे यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व बुफे देऊन देऊन सन्मानित करून शुभेच्छा देण्यात आल्या .तसेच यावेळी शहीद कामटे संघटनेच्यावतीने रेल्वेच्या विविध मागण्या व समस्यांचे निवेदन देण्यात आले, सांगोला रेल्वे स्टेशनवर खालील रेल्वे गाड्यांची गरज असून तसेच आवश्यक भौतिक सुविधाही निर्माण करण्याकरता संबंधितांना आदेश करावेत या मागण्या करण्यात आल्या.
प्रामुख्याने दादर- सातारा -दादर एक्सप्रेस रेल्वे सेवा दररोज सुरू करावी,सांगोला ते दिल्ली रेल्वे,सांगोला ते कलकत्ता रेल्वे,सांगोला ते दानापूर ( पटना)रेल्वे,
नागपूर ते पंढरपूर- वास्को- दि -गामा रेल्वे सेवा दररोज सुरू करावी. सायंकाळी 5 -6 च्या दरम्यान कुर्डूवाडीवरून मिरजकरिता शटल सेवा दररोज सुरू करावी.
सांगोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी कमी असून ती वाढवावी. सांगोला स्टेशनवर खासदार निधीतून कोच इंडिकेटर बसवावेत .
वरील लांब पल्ल्याच्या रेल्वेचि सेवा ही प्रवाशांकरता आवश्यक आहे तालुका व शेजारील 5-6 तालुक्यातील अनेक उद्योजक हे व्यवसाय , व्यापारानिमित्त कायमस्वरूपी ये-जा असते सांगोल्यातून त्यांची थेट सोय झाल्यास वेळेची मोठी बचत होणार. तसेच स्टेशनवर कोच इंडिकेटर बसविल्यास डब्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. एक्सप्रेस गाडीचे डबे प्लॅटफॉर्मच्या बाहेर जात असल्याने प्रवाशांना धोकादायक स्थितीतून वाट काढावी लागत आहे.31- बी महूद रेल्वे गेट येथे तात्काळ उड्डाणपूल बांधावा, मिरज रोड येथील रेल्वे बोगद्याचे काम निकृष्ट असल्याने पाणी गळती कायमस्वरूपी होत आहे तरी येथील दर्जेदार काम करण्याकरिता आदेश द्यावेत ,तरी यावरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या मंजूर कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रति केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, व्ही सोमंना,रेल्वे राज्यमंत्री बिट्टू,
रेल्वे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे मुंबई,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर यांनाही देण्यात आले आहेत. यावेळी नीलकंठ शिंदे सर, प्रा. प्रसाद खडतरे, विशाल नलवडे, बाळासाहेब टापरे सर , नंदकुमार राजेमाने,अमोल मोहिते, महेश नलवडे,दिग्विजय चव्हाण सर, संतोष कुंभार सर, प्रकाश खडतरे, सुयोग बनसोडे सर, चारुदत्त खडतरे , तोसिफ शेख यांच्यासह कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहीद अशोक कामटे संघटनेने दिलेल्या निवेदनात रेल्वेच्या नवीन सेवा व सांगोल्यातील भौतिक सुविधा संदर्भात विविध मागण्या केल्या आहेत त्याबाबत आपण स्वतः रेल्वे मंत्रालय, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापकाकडे सकारात्मक भूमिका मांडून येत्या काळात लवकरात -लवकर येथील रेल्वेचे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.
-खासदार धैर्यशील मोहिते -पाटील