जिल्हयातील 2 विधानसभा महिलांना द्या: भीम शक्ति संघटनेचा प्रस्ताव
मुख्य संपादक-हिमायूं अली, मोबाइल नंबर-8975250567

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयात सहा विधानसभा आहेत. त्यापैकी निदान दोन क्षेत्रात महिलाना उमेदवारी देऊन 50 टक्के आरक्षणाचा नियम पाळा, असा स्तुत्य प्रस्ताव भीमशक्ती संघटनेने दिला आहे. या संदर्भात राज्य सभा खासदार आणि संघटनेचे संस्थापक नेते चंद्रकांत हांडोरे यांना रीतसर निवेदन देण्यात आले आहे. तत्पूर्वी संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकीत सर्व संमतीने हा प्रस्ताव पारित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी आज दिली.
राजकिय क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षणाचा नियम आहे. संसदेत तो लागू पडतो. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी देताना महिलाना प्राधान्य फार कमी मिळते. चंद्रपूर जिल्हयात मागील कार्यकाळात स्व. बाळू धानोरकर यांच्या व्यक्तिगत जिद्दी मुळे त्यांच्या पत्नी आमदार झाल्या होत्या. त्या आता खासदार झाल्या आहेत. मात्र जिल्ह्याच्या सहा पैकी सद्या एकाही विधानसभेत महिलाना स्थान नाही.
लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पुरुषांचाच वरचष्मा आहे. कुठलाही पक्ष आधी उमेदवारीचा देताना महिलांचा विचारच करत नाहीत. सद्या चंद्रपूर जिल्हयात हेच चित्र पाहायला मिळत आहे. यावर भीमशक्ती संघटनेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चे दरम्यान जिल्हाध्यक्ष कुणाल गायकवाड यांनी महिलांच्या विधानसभा निहाय आरक्षणाचा विषय चर्चेला आणला. त्यावर सर्वांनी आपलीं मते व्यक्त केली आणि विषयाचे स्वागत केले.
भिम शक्ती संघटनेची ही बैठक सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर विश्राम गृह येथे पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष कुणाल गायकवाड होते. तर भीमशक्ती महिला विदर्भ प्रदेशाध्यक्ष अपेक्षा पिंपळे, यांच्या नेतृत्वात पार पडली गायकवाड यांनी आपले मत मांडताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यापैकी किमान दोन तरी विधानसभा क्षेत्र महिलांना देण्यात यावे असा प्रस्ताव ठेवला.
महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे परंतु 6 ही विधानसभा क्षेत्रामध्ये पुरुषांची नावे आघाडीवर आहेत. महिलांना सन्मान द्यायचा असेल तर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्र पैकी दोन तरी विधानसभा महिलांना देण्यात याव्या असे ते म्हणाले. यासाठी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक व काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांना रीतसर निवेदन देण्यात आले. खासदार हांडोरे यांनी आपल्या संघटनेने महिला सन्मानाचा मुद्दा पुढे केल्याचे समाधान आणि कौतुक केले. हा प्रस्ताव काँग्रेस पक्ष श्रेष्ठी पर्यन्त पोहोचवू असे आश्वासन त्यांनीं दिलें आहे. या बैठकीचा समारोप प्रेम लाल मानकर यांनी केला संचालक कोमल बोरकर यांनी केले बैठकीत अलका जग जहा पे, वर्षा वाघाडे, भारती सिडाम, रमा मेश्राम वंदना गेडाम तनुजा
वाळके सोनी ब्राह्मणे नलिनी पाटील नलू डोनाळकर सतीश नगराळे संतोषी गोमासे नितीन दुधे व वैशाली रामटेके यादी उपस्थिती होते.