ताजे अपडेट

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा

सांगोला नगर परिषदेच्या वतीने आयोजन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांची माहिती

 

सांगोला :सांगोला नगरपरिषद सांगोल्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 5 व 6 मार्च रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हॉल (टाऊन हॉल) येथे महिलांसाठी पाककला स्पर्धा व होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी सांगितले.

मंगळवार 05 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 2 अशी व्यवस्था आणि सजावटीसाठी वेळ असेल. दुपारी २ ते ४ या वेळेत पाककला परीक्षा होणार आहे. स्वयंपाकासाठी जेवण भातापासून बनवावे, स्पर्धकांनी घरून जेवण आणावे आणि सकाळी ठीक 10 वाजता हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था करून सजावट करावी. स्वयंपाक करताना पंचाचा निर्णय अंतिम असेल. प्रथम क्रमांकासाठी 5000 रुपये आणि पदक,द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये आणि पदक, तृतीय क्रमांकासाठी 2 हजार रुपये आणि पदक आणि द्वितीय क्रमांकासाठी 1 हजार रुपये आणि पदक देण्यात येणार आहे. बुधवार 06 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांक विजेत्या, द्वितीय क्रमांक विजेत्या व तृतीय क्रमांक विजेत्याला पैठणी साडी देण्यात येणार आहे. 06 रोजी पारितोषिक वितरण समारंभ 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख ४ मार्च आहे. नाव नोंदणीसाठी प्रतिभा कोरे ७९७२१००३६५, जयश्री खटरे ७७०९०९२२४१ यांच्याशी संपर्क साधावा. बचत गटाचे खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्याचे आहेत,त्यांनी श्री बिरप्पा मो. 9834924375 या क्रमांकावर संपर्क साधावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker