ताजे अपडेटशेतीवाडी
अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी कृषी विभागाची योजना
योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर 15 मार्च पर्यंत अर्ज करावेत

सोलापूर :राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक या योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन , तुषार सिंचन योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर 15 मार्च पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी त्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
या योजनेतर्गंत अर्ज मागविण्यासाठी दि.1 मार्च ते 15 मार्च 2024 कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावासाने यांनी पत्रकान्वये कळविले आहे.