
सांगोला : रामनवमीनिमित्त आज गुरुवार दि.१८ एप्रिल २०२४ रोजी भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सांगोला शहर व तालुक्यातील सर्व रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिर, महादेव गल्ली, सांगोला येथून या शोभायात्रेला प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा नेण्यात येणार आहे. या शोभायात्रेत अकरा फुटी भव्य दिव्य अशी श्रीरामांची मूर्ती मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर भव्य लाईट व लेझर शोचेही आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.